या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चहा, काफी, वगैरे घेण्याचे वर्ण्य करावें. कारण दुकानांतील भांडी हजारों लोकांच्या तोंडास लागत असल्यामुळे त्यांपासून क्षय, उपदंश, वगैरे सारखे भयंकर रोग होण्याचा बराच संभव असतो. यासाठी ज्याचे भांडे त्याने साफ करून वापरणे सर्वांत उत्तम. आपल्या समाजामध्ये बायको नवऱ्याचें उच्छिष्ट खात असते. असें अझून देखील आढळून येते. खरोखरी पाहिल्यास हे फार वाईट होय. कारण कोणत्याही हेतूनें ही चाल पडलेली असली तरी पण पुष्कळदां बिचाऱ्या बायकोला मात्र त्यापासून विनाकारण वाईट परिणाम भोगावा लागतो. जेवतांनां खच्छ वस्त्रे परिधान करण्याविषयी सांगण्यांत आलेच आहे. सोंवळ्याचे नियम आरोग्य व स्वच्छता राखण्यासाठी केलेले आहेत परंतु त्यांचा मूळचा उद्देश आतां एके बाजूसच राहिला आहे. एकंदरीत रोगनिवारणार्थ स्वच्छतेकडे जितकें काळजीपूर्वक लक्ष्य पुरवावें तितकें थोडेंच. रोज अंगाला उटणे लाऊन स्नान करणे हे हितावह होय, हंडे भरून पाणी अंगावरून ओतूनही मळ कायम राहिला तर त्या स्नानाने तादृश फायदा होणार नाही. यासाठी स्नान करितांना अंग चांगले घांसून स्वच्छ केले पाहिजे. स्नानानंतर अंगास चंदनादिक पदार्थ लावावेत. आपले वापरण्याचे कपडेलत्ते नेहमी स्वच्छ असावेत; मग ते दिवसा आंगांत घाला. - १ उपदंशाच्या जंतूला "स्पारोकिटा पॅलीडा" असें ह्मणतात. यांचा आकार साधारण स्पाश्रिलायसारखा असतो.