या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वयाचे असोत किंवा रात्री पांघरण्याचे असोत, साबू अगर रिठा लाऊन ते धुवावेत व जरूर लागल्यास गरम पाण्यात उकळून नंतर ते वापरण्यात यावे. कारण पुष्कळदां गंजकर्ण, खरूज, इसब, खवडे, वगैरे रोगांचे जंतू ज्यांत आहेत असे कपडे थंड पाण्याने धुतल्याने जंतुरहित होत नाहीत. यासाठी असे कपडे जंतुरहित करणे झाल्यास गरम पाण्यात उकळून मग ते वापरणे बरें. पुष्कळदां बायका, धुण्याचा त्रास वाचविण्यासाठी मुलांच्या मलमूत्राने भिजलेले कपडे न धुतां तसेच सुकवून वापरतात. ह्याचा परिणाम असा होतो की, अशा प्रकारचे मलमूत्राचे पूट मिळालेले कपडे वापरण्यांत आल्याने त्यांनां घाण येते व त्यामुळे मुलांच्या कोमल त्वचेवर एकप्रकारचे उगवण येते व त्यापासून १आर्यवैद्यकशास्त्रांत संसर्गजन्य रोगांसंबंधाने लिहितांनां पुढीलप्रमाणे माहिती दिली आहे. त्यावरून आपल्या प्राचीन वैद्यशास्त्रज्ञांना रोगबीजांचा प्रसार कशा रीतीने होतो याची किती चांगली कल्पना होती हे सिद्ध होतें: प्रसंगादात्रसंस्पर्शानिःश्वासात सहभोजनात्। एकशय्यासनाच्चैव वस्त्रमाल्यानुलेपनात् ॥ कुष्टं ज्वरश्च शोषश्च नेत्राभिष्यन्द एव च । औपसर्गिकरोगाश्च संक्रामन्ति नरान्नरम् ॥ मकर (माधवनिदान-कुष्टरोगप्रकरण.) अर्थः-मैथुनादि प्रसंगाने, शरीराच्या संस्पर्शानें, श्वासोच्छासाने, एकत्र जेवल्याने, निजल्याने व बसल्याने, तसेच रोग्याच्या अंगावरील वनें पांघरल्याने, फुलें हुंगल्याने किंवा गंध लाविल्याने, कुष्ट ( यांत बहुतेक त्वचेचे रोग येतात ), ज्वर (यांत टॉयफॉईड ज्वर, देवी, गोवर, न्युमोनिआ,वगैरे निरनिराळे ज्वर येतात ), शोष (क्षय), नेत्राभिष्यंद (डोळे येणे, खुपया वगैरे ) संसर्गजन्य रोग एकापासून दुसऱ्याला होतात.