या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ सर्वांगास कंडू सुटते, अर्थात् खाजविलेल्या जागी निरनिराळ्या रोगजंतूंनां वाढण्यास आयतीच जागा मिळते. यासाठी मलमूत्राने दूषित झालेले कपडे खच्छ धुतल्याशिवाय कधीही वापरूं नयेत. गाद्या, रजयी, वगैरे न धुतां येणान्या कपड्यांवर मुलांनां निजविण्यापूर्वी त्यांवर मेणकापड घालून त्या मेणकापडावर दुसरे वस्त्र हातरून मग त्यांना त्यांवर निजवावें ह्मणजे गादी किंवा रजयी मलमूत्रानें न भिजतां खच्छ राहील. फिरायाला अगर दुसऱ्या कशाहीकरितां बाहेर जावयाचे झाले ह्मणजे आपण सर्वांच्या वरील (जे लोकांच्या पहाण्यांत येतात असे ) कपडे चांगले घालतों व आंतील (ज्यांचा त्वचेशी प्रत्यक्ष संबंध येतो असे ) कपडे मलिन असले तरी त्यांची पर्वा करीत नाही, हे फार वाईट आहे. त्वचेला लागून असणारे कपडे घामाने भिजून खराब होतात. त्यांची वेळी योग्य काळजी घेतली नाही ह्मणजे त्यांत सडण्याची क्रिया सुरू होते. यासाठी ते कपडे विशेष स्वच्छ ठेवण्याची खबरदारी बाळगिली पाहिजे. कपडे नेहमी पांढरे वापरणे चांगले. यांत आरोग्यशास्त्रदृष्टया दोन फायदे आहेत. एक तर, त्यांनां मल लागला म्हणजे सहज समजतो व दुसरा, पांढऱ्या रंगाला जंतू घाबरतात. याच कारणाने शस्त्रवैद्य किंवा त्यांला मदत करण्यासाठी असणाऱ्या परिचारिका (नसीस) शस्त्रप्रयोगाचे वेळी श्वेतवस्त्र परिधान करितात. काळा किंवा त्यासारखे दुसऱ्या रंगाचे मळखाऊ कपडे वापरू नयेत. असे कपडे नेहमी स्वच्छ ठेवितां आल्यास वापरण्यास हरकत नाही. रोगजंतू आंगांत शिरण्याचा दुसरा मार्ग म्हणजे श्वासमार्ग हा