या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होय. या संबंधाने काळजी घ्यावयाची ती ही की, घरांतील केरकचरा काढतांना तो फार हळूहळू झाडून काढावा. जोराने झाडल्यास धूळ घरांतील हवेत पसरते व श्वासावाटे आपल्या फुफ्फुसांत जाते; आणि त्यामुळे निरनिराळे रोग उत्पन्न होतात. ही गोष्ट पुष्कळांना माहीत असूनही तिकडे दुर्लक्ष्य करण्यांत येतें ही फार खेदाची गोष्ट आहे. पहिल्याने थोडे पाणी शिंपून नंतर झाडावें ह्मणजे धूळ फारशी उडत नाही. घरांत जरूर तेवढेच सामान ठेवणे बरें. स्वस्त मिळतात म्हणून किंवा घरशोभा वाढविण्याकरितां कपाटें, मेजें, आलमिरें, खुा, तन्हत-हेची शोभिवंत काचपात्रे किंवा इतर भांडी, वगैरे जरूर नसलेल्या सामानांचा संग्रह करणे बरे नाही. त्यापासून घरांत जागेची अडचण होते इतकेच नाही परंतु तें रोज साफसूफ करण्यांत येत नसल्याने त्यांवर लाखों जंतू राहतात. कपाटें, टेबलें, खुा, वगैरे लांकडी सामानावरील धूळ सुका फडका मारून न काढतां तो ओला करून त्याने ती पुसावीत. यामुळे त्यांचे पॉलिश कमी होईल हे खरे; पण आपल्या आरोग्यापेक्षां तें कांहीं जास्त नाही. जमिनीवर काथ्या किंवा चटया कायमच्या बसवून टाकू नयेत. कारण तसे केलें असतां जमिनी व सामान साफसूफ करण्यास कठीण पडतें. घराला रंग देणें तो नेहमी पांढरा असावा; कारण एक तर त्यावर मळ लागला तर तो लगेच कळतो व दुसरें, पांढऱ्या रंगाला व उजेडाला जंतू बाचकतात; ह्मणून जंतूंचा नाश करण्यास सूर्यप्रकाश व शुद्ध हवा यांसारखे दुसरे रामबाण औषधच नाही. ह्मणून या दोन गोष्टींकडे पूर्ण लक्ष्य द्यावे. त्याचप्रमाणे गादी,