या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ उशा, चादर, कांबळ, वगैरे कपडेलत्ते, नेहमी उन्हांत व शुद्ध हवेत ठेवावेत ह्मणजे जंतूंचा नाश होऊन ते शुद्ध व जंतुरहित होतील. - घराला जिकडेतिकडे खांच, खळगे, नसावेत किंवा नकशीदार कोरीव काम देखील केलेले नसावें. आपल्या जेवणाच्या व निजण्याच्या खोलीत कोणत्याही प्रकारचे अडगळीचें सामान ठेऊ नये. ह्या जागा विशेष स्वच्छ असाव्यात. घरांत उजेड व हवा येऊ द्यावी. अंधार असतां कामा नये. घराची जमीन खच्छ राखण्यास आपण शेणाच्या सारवणाचा उपयोग करितों परंतु सारवणाकरितां शेण वापरल्याने जंतूंच्या वाढीस व प्रसारास बरीच मदत होते. यासाठी शेणाचें सारवण घालणे बरे नाही. कित्येक मातीचें सारवण घालतात पण तें देखील बरें नाहीं. सारवणासाठी पाण्यात थोडे फेनाईल घालावें व सारवल्यानंतर जमीन सुकेपर्यंत खिडक्या आणि दारे उघडी ठेवावीत. अगर दुसऱ्या शुद्धिकर औषधांचा उपयोग करावा. एकंदरीने शेणाने सारविण्याची रीत जितकी लवकर मोडेल तितकी बरी. रहाण्यासाठी जागा पसंत करणे ती, सूर्यप्रकाश व शुद्ध हवा येईल अशी असावी. पुष्कळदां आपण जागेच्या शोधांत असलों मणजे काही गोष्टींकडे लक्ष्य पुरवीत नाही. उदाहणार्थ; एखादी जागा, त्या जागी प्लेग, कॉलरा, क्षय, टायफॉईड ज्वर अगर दुसन्या कोणत्याहि जंतुजन्य रोगानें मनुष्य मेल्यामुळे सोडलेली असते. आपणाला हे काही माहित नसल्याने जागेच्या सोईकडे लक्ष्य देऊन ती जागा आपण पसंत करितों व काही दिवसांनी या रोगांपैकी