या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५ एखाद्या रोगाने घरांतील माणसें दुखणाईत होतात. याचे कारण, ती जागा सोडून जाणाऱ्यांनी सोडतेवेळी किंवा नवीन येणाऱ्यांनी आल्यावर पहिल्याने जंतुनाशक द्रव्याने साफ केलेली नसते. घरांत घाण येत असली तर त्याबद्दल पूर्ण चौकशी करून ती न येईल अशी व्यवस्था ठेवावी. घरांतील मोयांत जंतुनाशक द्रव्य घालावें. शेरीच्या बाजूला खिडकी असल्याने त्यावाटे घाण येत असेल तर ती खिडकी बंद करून टाकावी. घरांतील जमिनीवर व कोनाड्यांत केरकचरा, थुकी, वगैरे मलमूत्र कधीही टाकू नये. घर नेहमी साफ ठेवावें. श्वासावाटे जंतूंचा प्रवेश झाल्याने होणाऱ्या रोगांपैकी काहीं उदाहरणे खालीं सांगितली आहेत. पडसें. पडशासारखें साधे दुखणे जंतूंमुळे होतें ही गोष्ट पुष्कळांना खरी वाटणार नाही. ओलांत किंवा थंड हवेत फिरल्याने अगर त्या सारख्याच दुसऱ्या साध्या कारणांनीं पडसे येते, असे लोक समजतात. खरी गोष्ट पाहूं गेल्यास वरील कारणांनी प्रकृतींत बिघाड होतो व त्यामुळे जंतूंनां आपला अंमल चालविण्यास आयतीच संधी सांपडते. पडशामध्ये नाकांतून येणारा शेंबूड किंवा घशांतून पडणारा कफ जर सूक्ष्मदर्शक यंत्राखाली घालून तपासला तर त्यांत स्ट्रेप्टोकोकाय, स्टॅफिलोकोकाय, टायफॉईड बॅसिलस्, न्युमोकोकाय, इन्फ्लुएन्झा बॅसिलस, यांपैकी निरनिराळ्या प्रकारचे कित्येक जंतू सांपडतात व जसजसी त्यांना अनुकूल परिस्थिति मिळते तसतसा ते पुढे आपला