या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ अंमल चालवितात. म्हणून आरंभी जरी थोडेसें पडसे असले तरी ते पुढे कित्येकदां न्युमोनिआ, क्षय वगैरे रोगांवर जाऊन पडतें. आपल्या वैद्यशास्त्रांत देखील 'पडशाची हयगय केली असतां तें क्षयावर जातें' असें झटले आहे. यासाठी त्याची आरंभीच शक्य ती काळजी घेतली पाहिजे. पडशाचा रोगी डॉक्टर किंवा वैद्याकडे गेला ह्मणजे त्याला गुळणे, रेचक व दुसरी औषधे देण्यांत येतात. या सर्वांचा हेतु जंतूंचा नाश करून प्रकृति पूर्वस्थितीवर यावी, हा असतो. पुष्कळदां रात्रीच्या वेळी नाटक पहायाला गेलें ह्मणजे दुसऱ्या दिवशी बहुधा पडसें येते. याची कारणे पाहूं गेल्यास रात्रीची थंड हवा, जागरण, बर्फ, सोडावॉटर, लिमलेट, कोल्डूिक, वगैरे पेये घेणे, रस्त्यांतील व नाटकगृहाच्या हवेंतील निरनिराळे जंतू, हीं होत. म्हणून अशा हवेत श्वासोच्छास केला ह्मणजे सहजच पडसे येतें. एकंदरीत एका रात्रींत प्रकृति बिघडून त्यांत जंतूंची सहज लागवड होते, व ही गोष्ट कोणाच्या लक्ष्यांत येत नसल्याने लोक जागरणाने वगैरे पडसें आलें, असें ह्मणतात. पडसे झाल्यावर शेंबूड पुसण्यासाठी एखादा स्वच्छ रुमाल ठेवावा. मिळेल त्या कपड्यांना शेंबूड पुसूं नये अगर मिळेल तेथें फांसू नये. रुमाल वगैरेची सोय नसल्यास जुन्या कपड्यांची स्वच्छ केलेली लहान लहान फडकी या कामी वापरावीत व मग ती जाळून टाकावीत अगर उकळवून धुतल्याशिवाय पुन्हां वापरू नयेत. येथे एक गोष्ट सांगणे जरूर आहे ती ही की, जंतूंमुळे होणारा रोग सर्व माणसांस सारख्याच प्रमाणानें जाचक होतो असें नाहीं. ह्मणजे एकाच