या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रोगानें गांठलेले ४-५ रोगी जर घेतले तर त्यांस त्या रोगामुळे होणारे विकार कमीजास्त प्रमाणाने झालेले आढळून येतात. यांचें कारण व्यक्तीची ताकद व प्रकृति जशी असेल त्यावर अवलंबून रहाते. एखादें दुखणे येऊन गेल्यानंतर मागाहून रहाणारा अशक्तपणा कमीजास्त असणे हे देखील याच कारणावर अवलंबून असते. क्षय. जर आपण आपल्या घरांत सूर्यप्रकाश व शुद्ध हवा येण्याची योग्य तजवीज ठेविली आणि खाण्यापिण्यामध्ये योग्य काळजी घेऊन प्रकृति सदृढ राखली तर क्षयालाही भिण्याचे फारसे कारण नाही. ग्रेटब्रिटनमध्ये या रोगाने दरवर्षी ४०००० लोक मृत्युमुखीं पडत असत. पण तिकडे वर सांगितल्याप्रमाणे त्या संबंधाने योग्य काळजी घेण्यात येऊ लागल्यापासून या रोगापासून होणारी प्राणहानि बरीच कमी झाली आहे. या रोगाच्या जंतूला ट्युबर्कल बॅसिलम असें ह्मणतात. (आकृति ७ पहा.) ह्या जंतूचा आकृति ७ वी. शोध पहिल्याने प्रो. कॉक नांवाच्या जर्मन / जंतुशास्त्रवेत्त्याने लाविला. हे जंतू सूर्यप्रकाश is नसलेल्या अंधाराच्या, घाणेरड्या व कोंदट " जागेत असतात. यांवर सूर्यप्रकाश व शुद्ध हवा येऊ दिल्यास ते गाफील व गलित होऊन मृत होतात. यासाठी क्षयरोगाचे जंतू आपल्या घरांत राहूं नयेत असे ज्यांना वाटत असेल त्यांनी वर सांगितल्याप्रमाणे घरांत सूर्यप्रकाश व शुद्ध हवा चांगल्या रीतीने