या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ येईल अशी तजवीज राखावी. हा रोग पसरण्याचे दुसरे मोठे कारण मटले ह्मणजे जिकडे तिकडे धुंकणे, हे होय. यामुळे अशी थुकी अगर कफ सुकल्यावर त्यांत असलेले जंतू वाऱ्यामुळे अगर केर काढतांना घरांतील हवेंत पसरतात व श्वासावाटे फुप्फुसांत जाऊन किंवा अन्नांतून जाऊन हा रोग एकापासून दुसऱ्या शेकडों माणसांत पसरतो. तशांत एखाद्या माणसाची प्रकृति अगोदरच क्षीण झालेली असली झणजे जंतूंनी तो मनुष्य लगेच पछाडला जातो. यासाठी थुका किंवा बेडका टाकणे झाल्यास तो निरुपयोगी फडक्यांवर अगर कागदांवर टाकून ती जाळून टाकावीत. अथवा त्यासाठी एखादें निराळे भांडेच असावें. त्या भांड्यांत जंतुनाशक द्रव्याचे पाणी घालावे व त्यांत धुंकी किंवा कफ टाकावा. अशा भांड्यांतील घाण रोज घरापासून लांब अशा जागी, खाडा खणून त्यांत घालून पुरून टाकावी. तशी सोय नसल्यास त्यांत एखादें तीव्र जंतुनाशक द्रव्य घालावें अगर आधणाचें पाणी घालावे व मग शौचकूपांत टाकावी व भांडे साफ करावें. ही गोष्ट आपले लोक अजूनही लक्ष्यांत न आणतां निष्काळजीपणाने रहातात ही फार खेदाची गोष्ट आहे. एखाद्या चाळीत जर जाऊन पाहिले तर त्यांतील भिंती, जिने व कोनाडे, थुकीनें भरून गेलेले दिसतात. कित्येक ठिकाणी तर "येथे थुकू नये" असे लिहिलेले असतांही त्याच अक्षरांवर थुकी टाकलेली दिसते. या निंद्य प्रकारामुळे अशा थुकीतील जंतू प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने आपल्यालाच जाचक होतात हे कोणीही विसरता कामा १ हे जंतू त्याचेच्या मार्गानेही जाऊ शकतात.