या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९ नये. यासाठी प्रत्येकानें या बाबतींत वर सांगितल्याप्रमाणे शक्य ती काळजी घेतली तर सर्व चाळ स्वच्छ राहून त्यामुळे सर्वांस आरोग्य प्राप्त होईल. आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते ती ही की, पुष्कळाना विशेषतः मुलांनां बोटे तोंडात घालण्याची संवय असते. कित्येक तर पुस्तके वाचतांना बोटाला थुकी लाऊन पाने फिरवितात. काही दुकानवाले गि-हाईकाने साखर वगैरे कांहीं जिन्नस मागितले म्हणजे ते बांधून देण्यासाठी त्यांच्या दुकानांत लाऊन ठेविलेल्या • कागदांच्या बंडलांतून एखादा कागद काढण्यासाठी बोटें थुकीनें ओली करून काढीत असतात. यामुळे देखील हा रोग पसरण्यास बरेच फावते. यासाठी बोटें तोंडात घालणे, किंवा उगीच चाटीत रहाणें अगर पुस्तक वाचीत असतां धुंकी लाऊन पानें फिरविणे यापासून होईल तितकें दूर रहावें. कारण हे जंतू अन्नमार्गावाटेनेही शरीरांत प्रवेश करितात. कित्येकांची अशी समजूत असते की, क्षयरोग्यांचीच धुंकी जंतुयुक्त असते. यासाठी त्यांनी मात्र जिकडे तिकडे धुंकू नये. पण ज्यांनां क्षय नाहीं अशा लोकांनी थुकल्यास काय हरकत आहे ? परंतु त्यांना माहीत नसते की, थुकीतून क्षयाशिवाय दुसरेही पुष्कळ रोगांचे जंतू अशा रीतीने बाहेर पसरतात. मनुष्य क्षयरोगी जरी नसला तरी त्याच्या तोंडांत दुसऱ्या पुष्कळ रोगांचे जंतू असतात. हाणून असा मनष्य जरी धुंकला तरी त्यापासून दुसच्यांनां रोग होण्याचा संभव असतो. यासाठी मनुष्य क्षयरोगी असो वा नसो त्याने भलत्या ठिकाणी थुकणे हे कधीही चांगले नव्हे.