या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० अंगांत रोगजंतू शिरण्याच्या तिसऱ्या मार्गास सुरवात करण्यापूर्वी थोडे सांगणे जरूर आहे ते हे की, पाश्चूर साहेबांनी केवळ जंतूंचाच शोध लाविला असें नाहीं तर पू व शोथ होऊन ज्या जखमा किंवा व्रण भरून यायाला बराच काळ लागत असे किंवा कित्येकदां भरूनही येत नसत त्या सर्वाचे कारण जंतूंमुळे होणारी सडण्याची क्रिया (कोथभवन Putrifaction.) असून ती न व्हावी म्हणून त्यांनी काही औषधिद्रव्ये शोधून काढली. ह्या औषधीद्रव्यांचा उपयोग करण्यांत येऊ लागल्यापासून जखमेंत पू किंवा शोथ वगैरे जंतुजन्य विकृति होणे बरेच कमी होऊन त्या जलदी भरून येऊ लागल्या आहेत. या औषधी द्रव्यांपैकी सर्वांस माहीत असलेलें असें औषध झटले ह्मणजे अॅसिड कार्बालिक हे एक होय. ज्या वेळी रोगजंतूंचा नाश करणाऱ्या औषधिद्रव्यांचा ( Antiseptics.) हा शोध प्रसिद्ध इंग्रजी शस्त्रवैद्य लॉर्ड लिस्टर साहेब यांनां कळला त्या वेळी त्यांनी त्या द्रव्यांचा निरनिराळ्या जखमा, व्रण, वगैरेमध्ये उपयोग करून पाहिला व प्रयोगांअंती ती द्रव्ये खरोखरीच उपयुक्त असल्याचे त्यांना दिसून आले. निरनिराळे शस्त्रप्रयोग साध्य होऊ लागल्याचे आपण आतां में हल्ली पहातों तें सर्व लिस्टर साहेबांच्या अविश्रांत श्रमाचेंच फल होय. याच कारणामुळे लिस्टर साहेबांना "जंतुनाशक शस्त्रक्रियेचे जनक" हे नांव पडले आहे. हेच त्यांचे उपाय सर्व सुधारलेल्या राष्ट्रांतील वैद्य योजू लागले आहेत. पायांत जोडा घातल्याशिवाय कधीही चालू नये. कारण रस्त्यांत