या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कांटा, कांच, खडा, वगैरे लागण्याचा संभव असतो. व त्यामुळे लहानशी जरी जखम झाली असली तरी त्यांतून धनुर्वाताचे जंतू आंत जाऊन तो रोग होण्याचा संभव असतो. हे जंतू गाईच्या गोठ्यांत, घोड्यांच्या पागेत व बागेतील मातींत बरेच असतात. आकृति ८ वी. (आ० ८ पहा.) ह्मणून एखादी जखम होतांच - हयगय न करितां ती लगेच गरम पाण्याने साफ करून तिच्यावर एखादें जंतुनाशक द्रव्य लावावें... 4 उदाहरणार्थ; चुना व गूळ, पेटलेल्या कोळशाची बुकी, बोरिक अॅसिड, कार्बालिक अॅसिड, वगैरे. कोळ्याचा घेरूसा व रस्त्यावरील माती जखमेवर घालण्याचा पुष्कळ प्रचार आहे पण हे अत्यंत वाईट आहे. म्हणून सर्वथा वर्ण्य करावें. पुष्कळदां पायाला अगर हाताला जखम झाल्याने मग ती एखादा खिळा लागल्याने झालेली असो किंवा कांच रुतल्याने झालेली असो-त्यांत पू होतो. याचे कारण शिरलेल्या पदार्थाला रोगजंतू लागून असल्यामुळे तो जखमेंत शिरतांच त्याच्याबरोबर हे जंतूही आंत शिरतात व पू होतो. परंतु ज्या वेळी शरीराच्या एखाद्या भागांत कळा येतात व त्या पोटांत औषध दिल्याने लगेच कमी होत नाहीत त्या वेळी डॉक्टर लोक रोगयुक्त भागांत सुई टोचून पिचकारीने औषध घालतात. ही गोष्ट पुष्कळांनी पाहिलीच असेल. अशा वेळी ह्या बाह्य पदार्थानें, झणजे दुखऱ्या भागांत बोंचलेल्या सुईनें, पू वगैरे होत नाही. याचे कारण ती आंगांत बोचण्यापूर्वी जंतुनाशक द्रव्यांनी शुद्ध केलेली असते. उपदंश व परमा हे रोग जंतुजन्य असून त्यांचे जंतू त्वचेच्या