या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ मार्गाने शरीरांत जातात. हे रोग दुष्टसंभोगापासून होत असल्यामुळे आपण दोहोंना एकच समजतों पण त्यांचे जंतू निरनिराळे आहेत. चिलटें, पिसवा, वगैरे सारख्या मध्यस्थ प्राण्यांच्या दंशापासून होणारे रोग. हिवताप-मलेरिआ. हिवताप हा प्लेगच्या तापाप्रमाणेच एक विषारी ताप असून तो हिंवतापाचे विष रक्तांत गेल्याने येत असतो. हे विष ह्मणजे एक प्रकारचे सूक्ष्मजंतू असतात. हे जंतू एका प्रकारची चिलटे किंवा ज्यांना आपण मुकुटें, डांस किंवा मच्छर असें ह्मणतो त्यांच्या शरीरांत असून ती माणसाला चावलीं ह्मणजे त्यांनी केलेल्या दंशस्थानांतून ते त्याच्या रक्तांत जातात व त्या माणसाला ताप येतो. ह्मणून या तापाला विषारी किंवा जंतुजन्य ज्वर असेंही नांव देतात. हा ताप यावयाचा असला ह्मणजे पहिल्याने जोराची थंडी भरून येते व नंतर ताप भरतो; ह्मणून याला हिवताप हे नांव पडलेले आहे. हा ताप पुष्कळ प्रकारांनी येत असतो. कित्येकांस २४ तासांनी, कित्येकांस ४८ तासांनी, कित्येकांस ७२ तासांनी व कित्येकांस रोजचा सारखा कांहीं मुदतीपर्यंत. आपण त्यांस अनुक्रमें एकांत्रा, तिजारा किंवा पहिरा, चौथरा व मुदतीचा अशी नांवें देतो. हिंवतापाची जागा-ज्या ज्या ठिकाणी पाणी, वनस्पती आणि उष्णता हीं एकत्र होऊन कुजायला लागतात त्या त्या ठिकाणी हा