या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३ ताप विशेषेकरून पहाण्यांत येतो. म्हणजे जेथे पाणी सांचून किंवा मुरल्यामुळे जमीन दलदलीत होते व त्यांत गवत वगैरे कुजणारे पदार्थ असून वरून फार जोराचे ऊन पडतें अशा जागी ह्या तापाचें विष तयार होते, असें ह्मणण्यास हरकत नाही. शेतांतील भात कापून घेतल्यावर भातखाचरांत ह्या तीनही वर सांगितलेल्या गोष्टी आश्विन किंवा कार्तिक व मार्गशीर्ष ह्या महिन्यांचे सुमारास आपोआप एकवटून येतात व ह्मणूनच त्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांत ह्या दिवसांत या तापाची सांथ आढळून येते. जेथे पाऊस व झाडी फार असते अशा प्रदेशांतही या तापाची सांथ असते. तसेंच नदी, ओढे यांच्या कांठी व जेथे पाण्यावर उंस, केळी, भात, वगैरे बागाईत फार पिकतें तेथेही या सांथी वारंवार उद्धवतात. अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांची पोटें पाहिली झणजे मोठी ढोलाप्रमाणे वाढलेली दिसून येतात; कारण वरचेवर हिंवताप येऊन गेल्यामुळे पोटांत कवलू ( पांथरी ) वाढलेली असते व त्यामुळे असे लोक नेहमी पांढरे फिक्कट दिसतात. आर्यवैद्यकांत अशा प्रकारच्या देशाला 'अनुपदेश' असें मटलेले असून त्या देशांतील हवा वाईट असते असे सांगितलेले आहे-(अनूपं तु कफोल्बणम् , वाग्भट-सूत्रस्थान ). मा - वर सांगितलेल्या जागांशिवाय जेथे जेथें जमिनीवर पाणी सांचून त्याची डबकी, पाणथळ, विहीर, तलाव, वगैरे बनलेले असतात तेथे तेथें व रस्त्याचे बाजूला, मोऱ्या-गटारांच्या खाचांत, मग ती जागा मोठ्या शहरांतील असो किंवा लहानशा खेडेगांवांतील असो, तेथे हे विष तयार होते. अशा जागी वन