या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पति किंवा कोणताही पदार्थ कुजू लागल्यामुळे त्या ठिकाणी बहुधा चिलटे फार असतात. हिवताप हा आजपर्यंत वाईट हवा व पाणी यांमुळे होतो असें आपण समजत होतो, व त्याचा मूळचा अर्थही ( माल झणजे वाईट व एअर ह्मणजे हवा) वाईट हवा असाच आहे. परंतु अलीकडच्या नवीन शोधांवरून हा ताप एक प्रकारचे डांस चावल्याने होतो, असे प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध झाले आहे. हा ताप इंग्लंडसारख्या थंड देशांत फारसा होत नाही. कारण, वर सांगितलेल्या तीन गोष्टींपैकी उष्णतेचा भाग तेथे फारच कमी असतो. शिवाय त्या देशांत जमिनीत किंवा जमिनीवर पाणी न मुरण्यासाठी व न सांचण्यासाठी फारच खबरदारी घेण्यात येते; परंतु त्याच खंडाच्या दक्षिणेकडील भागांत-इताली वगैरे देशांतउष्णता थोडी जास्त असल्यामुळे या तापाची सांथ वारंवार उद्भवते. आमचा देश मूळचाच उष्ण असल्यामुळे व पाऊसही बराच पडून तो जमिनीत मुरत असल्यामुळे, तसेंच गवत, पाचोळा, शेण, केरकचरा, वगैरे पदार्थ ठिकठिकाणी कुजत पडल्यामुळे आणि ओल व घाण नाहींशी करण्यासाठी आपले लोक फारशी काळजी घेत नसल्यामुळे किंवा त्यांस अशा घाणीने हिवताप होतो हे माहीत नसल्यामुळे या तापाची सांथ आपल्या या उष्ण देशांत फार येते आणि त्यापासून दरसाल लक्षावधि मनुष्यांची प्राणहानि होते! हिवतापाची चिलटें ओळखावींत कशी? चिलटांमध्ये पुष्कळ जाती आहेत, परंतु त्या सर्वांनीच हिंव