या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ताप येतो असे नाही. त्यांपैकी ज्यांमुळे हिवताप येतो अशी एकच जात आहे. तिला हिवतापाचें चिलट ( Anopheles Mosquito) असें ह्मणतात. सकृदर्शनी हे चिलट ओळखणे फार कठीण आहे परंतु त्याचा रंग, बसण्याची त-हा, वगैरे लक्षणांवरून ते सहज ओळखतां येते. हिवतापाच्या चिलटाचे पंखावर काळे डाग किंवा ठिपके असतात. तें इतर चिलटांप्रमाणे गुंग गुंग किंवा कुं कुं असा आवाज करीत नाही. हे चावलें तर समजत नाही. त्याची बसण्याची तन्हा इतर चिलटांहून निराळी असते. ह्मणजे ते एखाद्या जागी बसले असतां त्याचे डोके पुढल्या पायांमध्ये असून त्या पायांचे सांधे त्याच्या डोक्यावर आलेले असतात. डोक्याला वांक वगैरे कांहीं नसतो, ह्मणजे डोके सरळ रेषेत असते. त्याची रक्त शोषण करण्याची शुडिका बसलेल्या जागेजवळ असून तिच्यावर चार फांटे असतात. त्याचे डोके लहान व काळे असते. तसेच शरीर बारीक असून पाय लांब असतात. हे एखाद्या जागी बसलें ह्मणजे तिर्कस बसते. म्हणजे त्याच्या डोक्याचा भाग बसलेल्या जागेजवळ असून खालचा पंखांकडला भाग बाहेरच्या दिशेला असतो. ही बहुतकरून फार लांब उडून जात नाहीत. त्यांची उत्पत्ति विशेषेकरून उन्हाळ्यांत जास्त होऊन हिवाळ्यांत कमी होते. हिवतापाच्या चिलटांचे अन्न-चिलटांमध्ये नर व मादी अशा दोन जाती आहेत. त्यांपैकी हिवतापाचें चिलट हे स्त्रीजातीचे आहे. नरजातीच्या चिलटांस "क्युलेक्स” (Cules)