या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असें ह्मणतात. नर हा बहुतकरून वनस्पतिजन्य पदार्थ-फळेवगैरे खाऊन रहातो; परंतु त्याला ज्या वेळी फळे वनस्पती वगैरे मिळत नाहीत त्या वेळी तो रक्त पिण्यासाठी फिरत असतो. ह्मणजे नराला रक्ताची फारशी प्रीति नसते. तशी गोष्ट मादीची नसते; तिला रक्त फार आवडते. तिला ज्या वेळी रक्त मिळत नाही त्या वेळी ती वनस्पतिजन्य अन्नावर रहाते. जसे काय अशा वेळी तिला एकादशीचे उपोषणच घडतें ! मादी आपली उपजीविका मनुष्ये, जनावरें व पक्षी यांच्या रक्तावर करिते. हे चिलट भक्ष्यशोधार्थ रात्रीच्या वेळी फिरत असतें, व दिवसास जेथें कोठे अंधार असेल अशा घरांतील खोलीच्या कोनांत किंवा घराबाहेर अथवा गाईच्या गोठ्यांत स्वस्थ जाऊन बसते. चिलटांची उत्पत्ति--हीं चिलटे मागे सांगितलेल्या कोणत्याही सांठलेल्या पाण्याच्या पृष्ठभागावर, मग ते पाणी खोल असो किंवा उथळ असो, घरांत किंवा घराबाहेर, विहिरीत किंवा पोखरणींत, जमिनीवरील बरेच दिवस पडून असलेल्या पाण्याने भरलेल्या भांड्यांत, तसेंच चोंदलेल्या गटारांच्या खांचांत व रस्त्याच्या बाजूच्या चिखलट जागेत, आपली अंडी घालितात. ही अंडी पाण्याच्या पृष्ठभागावर असतांना काठीच्या तुकड्यांप्रमाणे फार बारीक दिसत असून ती इकडे तिकडे हालत असतात. ह्या अंड्यांचे पाण्यावर निरानराळ समूह असतात. ह्या समूहांचा आकार निरनिराळा असतो. कित्येकदा त्या समूहाचा आकार होडीसारखा असतो व तो समूह पाण्यावर काळ्या चिखलाप्रमाणे तरंगत असतो. चिलटांची अंडी मासे आणि बेडूक खाऊन टाकितात. तसेंच चिलटांचाही पाल,