या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३७ पाकोळ्या, कोळी व इतर किडे नाश करितात. चिलटें ही आपली अंडी वहात्या पाण्यात घालीत नाहीत. कारण अशा जागी घातल्यास ती कोठच्या कोठे जाऊन नाहीशी होतील, हे ज्ञान त्यांस असावेसे दिसते. ह्मणून ती आपली अंडी कोणत्याही निश्चल अशा सांचलेल्या पाण्यावर घालितात. अंडी घातल्यापासून ४८ तासांचे आंत त्यांवरील कवच फुटूं लागते व त्यांतून सजीव प्राणी ( Larva लार्डी) बाहेर येऊ लागतात. हे सजीव प्राणी पाण्याच्या पृष्ठभागावर असतांना ते पाणी जरा हालल्यास लगेच पाण्याच्या तळीं जाऊन बसतात. या सजीव प्राण्यांना एका आठवड्यांत पंख व पाय फुटूं लागतात. अशा स्थितीत त्यांस प्यूपा (Pupa) असे म्हणतात. ह्मणजे लाहाचे प्यूपा होण्यास एक आठवडा लागतो. प्यूपाची नंतर सुमारे ४८ तासांनी चिलटे होतात. ही चिलटें उडून माणसाचे किंवा दुसऱ्या प्राण्याचे रक्त खाण्यास इकडे तिकडे फिरत असतात. अशा रीतीने रक्त पिऊन आल्यावर पुनः वर सांगितल्याप्रमाणे संचित पाण्यावर येऊन हरघडी शेकडोंशें अंडी घालीत असतात. म्हणजे यांची भयंकर उत्पत्ति रहाटगाडग्याप्रमाणे एकसारखी चाललेली असते! एकंदरीने चिलटांना आपली अंडी घालण्यास कोणतें तरी पाणी लागते; ह्मणजे पाण्याशिवाय चिलटांची उत्पत्ति होत नाहीं एवढी गोष्ट सिद्ध झाली. चिलटें व त्यांचा हिवतापाशी संबंध-हिंवतापाचा प्रसार ज्या चिलटांनी होतो त्यांना 'अनोफिलीस मॉस्किटो' असें ह्मणतात, हे वर सांगितलेच आहे. आतां, अशी चिलटे जेव्हां