या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ एकाद्या हिवताप येत असलेल्या माणसाचे रक्त पिऊन नंतर दुसऱ्या निरोगी माणसास चावतात, तेव्हां त्यांच्या-चिलटांच्या-लाळेंत असलेले हिंवतापाचे जंतू त्याने रक्तशोषणासाठी केलेल्या दंशस्थानांतून रक्तांत शिरून त्या माणसास ताप येतो. ह्मणजे चिलटें ही हिवतापाच्या जंतूंची नेआण करणारी एक प्रकारची साधनेंच होत, असें म्हणण्यास हरकत नाही. चिलटांचे पोटांत जरी हे जंतू असतात तरी त्यांपासून चिलटांस कांहीही होत नाही. ही शक्ति ईश्वराने चिलटाला दिलेली आहे. अशाच प्रकारची शक्ति ईश्वराने पिसूच्याही अंगी दिलेली असते. म्हणजे पिसूच्या पोटांत प्लेगचे जंतू राहून त्यांपासून पिसूला काहीही होत नाही. हे हिवतापाचे विष किंवा जंतू एखाद्याच्या अंगांत शिरल्यानंतर सुमारे १२ दिवसांनी त्या माणसास थंडी वाजून ताप येऊ लागतो. अशा वेळी त्या माणसास वर सांगितलेली चिलटें चावून ती जर नंतर त्या घरांतील इतर निरोगी माणसांस चावली तर त्यांनाही ताप येऊ लागतो. अशा रीतीने एकाच घरांत पांच दहा देखील माणसें 'हिवतापाने आजारी पडूं शकतात. हिवतापाचे जंतू व त्यांची वाढ. हिवतापाच्या जंतूंची वाढ दोन प्रकारांनी होते. (१) माणसाचे रक्तांत. (२) चिलटाचे पोटांत.. (१) माणसाचे रक्तांत होणारी जंतूंची वाढः-रक्तांत होणारी जंतूंची वाढ समजण्यापूर्वी रक्तासंबंधाने थोडीशी माहिती