या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असणे जरूर आहे. यासाठी पहिल्याने रक्तासंबंधानें थोडासा विचार करूं. रक्त हे अतिसूक्ष्म लाल व पांढऱ्या चकत्या किंवा कण आणि रक्तोदक यांच्या मिश्रणाने झालेले आहे. रक्तांत पांढऱ्या चकत्यांपेक्षां लाल चकत्या संख्येने जास्त असतात, ह्मणजे सरासरी ५००-६०० लाल चकत्यांत एखादी पांढरी चकती असते. हे प्रमाण निरोगी व सशक्त माणसांत दिसून येते. लाल चकत्या ह्या आरोग्यरक्षणास जितक्या महत्त्वाच्या आहेत तितक्याच त्या नाजूकही आहेत; व त्यांचे संरक्षण करण्याकरितां सृष्टिकर्त्याने पांढऱ्या चकत्या त्यांबरोबरच निर्माण केल्या आहेत. ह्मणजे ज्याप्रमाणे प्रचारांत आपण बऱ्याचशा शिपायांवर एखादा पांढरा काँस्टेबल पहातो त्याप्रमाणेच ही योजना आहे, असें ह्यणण्यास हरकत नाही. पांढन्या चकत्या फार मजबूत असतात. रक्तांत कोणताही परकीय पदार्थ-जंतू , वगैरे शिरल्यास ह्या चकत्या त्यांवर कुच्याप्रमाणे तुटून पडतात व त्याला वेष्टून नाहींसें करितात. पण ही शक्ति जंतू किंवा त्यांचे विष ज्या प्रमाणानें कमीजास्त असेल त्यावर अवलंबून असते. अशा रीतीने ह्या पांढ-या चकत्या लाल चकत्यांला इजा होण्यापूर्वीच परकीय जंतूंना मारून टाकतात. परंतु रक्तांत शिरलेल्या परकीय जंतूंची शक्ति किंवा जोर जास्त असल्यास ते रक्तातील चकत्यांस उलट मारतात. असो. चिलटाने दंश केल्यावर त्यावाटे शिरलेले हे जंतू पांढऱ्या चकत्यांस न जुमानतां ज्या वेळी रक्तांत शिरतात त्या वेळी पहिल्याने लाल चकत्यांत शिरून त्यांस खाऊ लागतात. या वेळी सूक्ष्म