या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ecco प्रस्तावना, । अलीकडे पाश्चात्य विद्वानांनी लाविलेल्या शोधांवरून बहुतेक रोगांचे कारण विवक्षित जंतूंत आहे, अर्थात् हेच जंतू रोगोत्पत्ति करितात, असे सप्रमाण सिद्ध झाले आहे व ह्मणून जंतुशास्त्र हे वैद्यकशास्त्राचे एक अतिशय महत्त्वाचे अंग होऊन बसले आहे. हे शास्त्र अगदी आधुनिक असल्यामुळे आपल्या मराठी भाषेत त्यासंबंधी माहिती ज्यांत दिलेली आहे असे पुस्तक अझूनपर्यंत आढळण्यांत आलेले नाही. रोगप्रतिबंध व रोगपरिहार अर्थात् आरोग्यरक्षण या दृष्टीने या शास्त्राकडे पाहिले असतां तत्संबंधी ज्ञानप्रसार जितका व्हावा तितका थोडाच आहे. या शास्त्राने वैद्यकशास्त्रांत विलक्षण क्रांति घडवून आणिली आहे हे योग्यच आहे, व हे शास्त्र जसजसें परिपक्वदशेस येत जाईल तसतशी ती क्रांति विशेष स्पष्ट रीतीनें जाणवणार आहे. अशा या जंतुशास्त्राच्या मूलतत्त्वांविषयी अज्ञान असणे हे अत्यंत अनिष्ट व हानिकारक आहे. आपल्या समाजांतील आबालवृद्धांस व स्त्रीपुरुषांस या नवीन पण अत्यंत महत्त्वाच्या विषयासंबंधी व तदाधारभूत तत्त्वांसंबंधी अवश्य ती माहिती सुलभ भाषेत मिळावी व तद्वारा आरोग्यरक्षणाचा मार्ग सुलभ व सुखपरिणामी व्हावा या हेतूने हे लहानसें पुस्तक रचण्यांत आले आहे. हे पुस्तक तयार झाल्यावर मुंबईतील सुप्रसिद्ध डॉक्टर त्रिंबकराव दिनकर वेलणकर बी. एस् सी. एल्. एम्. अॅन्ड एस्. ह्यांनी ते काळजीपूर्वक वाचून पाहिले व या संबंधाने अनेक उपयुक्त सूचना केल्या त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे.