या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४० दर्शक यंत्राने पाहिल्यास लाल चकत्यांत एक प्रकारचे नवीनच बिंदू शिरलेले दिसून येतात. लाल चकतीचा (आकृति ९ पहा.) जितका भाग त्यांनी खाल्ला असेल तितका भाग काळा दिसू लागतो. अशा रीतीने लाल, चकतींत शिरल्यावर तो ती खाण्यास सुरुवात करितो व ती खाऊन तिची जागा आपण घेतो. याप्रमाणे तो ती चकती खाऊन पुष्ट झाल्यावर पूर्णस्थितीत येतो व नंतर त्याचे लहान लहान विभाग होतात. हे विभाग झालेले तुकडे किंवा कण ह्मणजे जंतूची पोरें होत. ही पोरें (Spores ) मग दुसऱ्या लाल चकत्यांच्या मागे लागतात. अशा रीतीनें लाल चकत्यांचा फडशा उडाल्याने अर्थातच त्या लाल चकत्या कमी होतात व असें झालें ह्मणजे त्या माणसाला फिक्कटपणा येतो. मग आपण त्याला पांडुरोग असें ह्मणतों. ज्या वेळी हे जंतू लाल चकत्या खाऊन पूर्ण वाढीत आल्यावर विभागण्यास किंवा फुटावयास सुरुवात होते त्या वेळी किंवा त्यापूर्वी जरा थोडा वेळ त्या माणसास थंडी वाजण्यास सुरुवात होते; नंतर ताप भरतो. ताप भरल्यावर त्या माणसाचें रक्त तपासून पाहिले तर वर सांगितलेले विभागून झालेले लहान लहान तुकडे किंवा त्या जंतूंची पोरें सर्व रक्तभर पसरलेली दृष्टीस पडतात. कोणत्याही जंतुजन्य रोगांत जे जे विकार नजरेस पडतात त्या बहुतेकांचे कारण निरनिराळे रोगजंतू व त्यांपासून उत्पन्न झालेल्या विषारी (टॉक्झिन्स ) पदार्थांचा रक्तांत संचय होणे हे असतें. ताप भरून झाल्यानंतर मग घाम येऊ लागतो. अशा वेळी