या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४१ रक्त तपासून पाहिले तर वर सांगितलेली सर्व रक्तभर पसरलेली जंतूंची पोरें नवीन लाल चकत्यांत शिरलेली दिसण्यांत येतात. अशा रीतीने रक्तांमध्ये जंतूंची वाढ विभाग होऊन होते, नरमादीसंयोगाने होत नाही, ही गोष्ट येथे लक्षात ठेवण्यासारखी आहे. कारण रक्त हे माणसाच्या शरीरांत एकसारखें जोराने चाललेले असल्यामुळे जंतूंना माणसाचे रक्तांत एकांत मिळत नाही व नरमादीसंयोगाने वाढ होण्यास एकांताची जरूरी असते; ह्मणून ईश्वराने माणसाचे रक्तांत जंतूंची वाढ विभागणीने करण्याची योजना केली आहे, असे दिसतें. (२) चिलटाचे पोटांत होणारी जंतूंची वाढः-चिलटाचे पोटांत जंतूंची जी वाढ होते ती नरमादीसंयोगानें होते; वर सांगितल्याप्रमाणे विभागून होत नाही. ज्या वेळी हिंवज्वरी माणसाचे रक्त हिंपतापाचें चिलट पितें त्या वेळी तें रक्त त्याच्या पोटांत जाऊन तेथें तें स्थिर होते. यांत नर व स्त्रीजातीचे जंतू असतात. या जंतूंना येथे आपोआप एकांत मिळतो, व नरमादीचा संयोग होऊन मादी गर्भवती होते. ही गभर्वती मादी चिलटाच्या पोटाचे पडद्यांत जाऊन स्वस्थ बसते व तेथें विते. व्याल्यावर तिच्यापासून झालेली पोरें चिलटाचे रक्तांत जातात. तेथे त्यांस योग्य असें खाद्य मिळत नाही, ह्मणून नंतर ती तेथून त्यांच्या (चिलटांच्या ) लालापिंडांत येऊन आपलें ठाणे देतात. असे चिलट जेव्हा एखाद्या निरोगी माणसास चावतें तेव्हां हे जंतू त्याच्या रक्तांत जाऊन त्याला ताप येऊ लागतो. काही जंतू असे असतात की, त्यांना आपली जीवितयात्रा पूर्ण