या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गितल्याप्रमाणे व्यवस्था करितील पण गरिबांनी काय करावें हा प्रश्न आहे. कारण जेथे पोटापुरतें अन्न मिळण्याची मारामार तेथें मच्छरदाण्या, पंखे, करोसीन तेल, औषधे, ही आणावींत कोठून ? यासाठी अशा गरीब लोकांसाठी त्या त्या गांवच्या कोणी तरी शहाण्या माणसाने या रोगासंबधाने सर्वांना समजेल अशा रीतीने पहिल्याने माहिती करून दिली पाहिजे. अशा लोकांना आजूबाजूस असलेला एखादा तलाव, विहीर, डबकीं, वगैरे सांठलेल्या पाण्यापासून चिलटांचा त्रास होत असल्यास त्यांवर राकेल तेल किंवा पेस्टेलीन टाकावें. पेस्टेलीन म्युनिसिपालिटीच्या दवाखान्यांत फुकट देण्यांत येतें. कदाचित् अशा लोकांस पोटासाठी श्रम करावे लागत असल्यामुळे तेल, वगैरे टाकण्याची त्यांच्याकडून व्यवस्था होत नसल्यास, तें म्युनिसिपालिटीने स्वतः केले पाहिजे. ५ औषधी उपायः-वर सांगितलेले उपाय योग्य रीतीने अंमलात आणल्यास बहुतकरून औषधांची जरूरी लागत नाही. परंतु वरील उपाय सर्वांनाच साध्य असतात असें नाहीं; ह्मणून अशा लोकांनी गांवांत हिवतापाची सांथ चालू असतांना वर सांगितलेली चिलटे दिसू लागतांच आठवड्यांतून निदान १५ ग्रेन ह्मणजे साधारणतः ८ गुंजा किनाईन घेत जावें. तसेंच मुलांसही त्यांच्या वयमानाप्रमाणे एखादा अन द्यावे. किनाईन घेणे ते जेवणाचे पूर्वी जरा अगोदर घेऊन लगेच जेवावें ह्मणजे बरें पडते. कित्येकदां कांहीं उष्ण प्रकृतीच्या माणसांस प्रकृतिवैचित्र्यामुळे विनाईन सोसत नाही. यासाठी अशा लोकांनी तें