या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ आंबट लिंबूच्या थोड्याशा रसाबरोबर घ्यावें, ह्मणजे चांगले लागू पडते. कोणतेही औषध प्रवाही रूपाने शरीरांत जितकें लवकर पचतें तितकें तें घनरूपानें पचत नाही. यासाठी किनाईन द्रवरूपाने मणजे वर सांगितल्याप्रमाणे लिंबूच्या रसांत मिळवून घेतलेले बरें. कित्येक लोक हा त्रास कोण करतो ह्मणून किनाईनच्या बाजारांत आयत्या मिळत असलेल्या गोळ्या आणून घेतात. पण अशा गोळ्या पुष्कळदां हवा लागल्याने बिघडून जातात किंवा त्यांवरील कवच (कोटिंग) कठिण असल्यामुळे त्या गिळल्यावर जाठररसांत न विरतां जशाच्या तशाच मलाबरोबर पडून जातात व त्यांपासून तिळमात्र फायदा होत नाही. एकंदरीत, किनाईन हे हिवतापावर रामबाण औषध आहे. अमक्या तमक्याचे हिवतापावरील रामबाण, वगैरे जाहिराती असतात, ती किनाईनचींच मिश्रणे होत. प्लेग. प्लेग हा उंदरांचा एक रोग असून तो मनुष्याला उंदरांपासून पिसवांच्या द्वारे होतो. ह्मणजे प्लेग होण्यास उंदरांवरील पिसवा ह्या मुख्य कारण आहेत. उंदरांमध्ये हा रोग सुरवातीस कसा आला, हे अद्याप समजलेले नाही. पण एवढी गोष्ट सिद्ध झाली आहे की, हा रोग एका उंदरापासून दुसऱ्या उंदरास, दुसऱ्यापासून तिसऱ्यास, अशा रीतीने उंदरांउंदरांमध्ये व नंतर उंदरामाणसांमध्ये पिसवांमुळे होतो. उंदरांमध्ये पुष्कळ जाती आहेत; पण प्लेगनें पछाडणाऱ्या अशा मुख्य दोन आहेत. एकास घूस किंवा गटारउंदीर असें ह्मणतात व दुसन्यास घरउंदीर असें