या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ह्मणतात. पहिल्या जातीचे उंदीर आकाराने मोठे असून गटार, मोऱ्या, शेरी, वगैरे ठिकाणी असतात. कित्येकदा हे उंदीर भक्षशोधार्थ आपल्या घरांतही येतात. या जातीच्या उंदरांस दर खेपेस सात आठ पोरें होतात. हे आकाराने मोठे असल्यामुळे त्यांच्या अंगावर त्या मानाने पिसवाही जास्त असतात. ह्या जातीच्या उंदरांमध्ये प्लेग बाराही महिने चालतो व त्याला काही अनुकूल स्थिति मिळाल्यावर तो विशेष जोरांत येतो. दुसऱ्या जातीचे उंदीर आकाराने लहान असतात, पण त्यांचे कान मोठे असून शेपूटही त्यांच्या मानानें बरेंच लांब असते. हे घरांतील सामानांत, कौलांचे खाली, तसेंच अडचणीच्या जागी राहतात. यांना दर खेपेस पांच सहा पोरे होतात. ह्या घरउंदरांचा व काळोखांत भक्ष्यशोधार्थ निघालेल्या घुशींचा मिलाफ होऊन प्लेगयुक्त पिसवा ह्या घरउंदरांवर चढतात व अर्थातच ह्या घरउंदरांपासून प्लेगचा प्रसार मनुष्यांत होतो. उंदरांत चिचुंदरीची जी जात आहे त्यांना प्लेग होत नाही. कारण त्यांच्या अंगावर असा एक गंधयुक्त पदार्थ असतो की, पिसवा त्याच्या वाऱ्यालाही जात नाहीत. - ज्याप्रमाणे प्लेग होणान्या उंदरांच्या वर जाती सांगितल्या त्याचप्रमाणे उंदरांउंदरांमध्ये व उंदरांमाणसांमध्ये प्लेग पसरविणाऱ्या अशा पिसवांची एक जात आहे. तिला प्युलेक्स चिओपिस् ( Pulex chiopes) असे म्हणतात. ज्या वेळी प्लेगनें लागून उंदीर मरतो व थंड होऊ लागतो त्या वेळी त्याच्या अंगावर असणाऱ्या पिसवा त्याला सोडतात कारण त्यांना सजीव प्राण्यांचे रक्त पाहिजे असते. त्यांना विशेषेकरून उंदरांचे रक्त प्रिय असतें 17