या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० यासाठी होताहोई तो त्या दुसरा उंदीर पाहतात. पिसवा आपल्या जागेवरून फार तर ३०-४० याडौंपेक्षां लांब जात नाहीत; म्हणून तितक्या जागेत जर त्यांना उंदीर सांपडला नाही तर जो कोणी प्राणी सांपडेल त्याच्या अंगावर चढतात व उंदरांपासून मिळविलेले प्लेगजंतू रक्तशोषणासाठी रोवलेल्या जागी सोडतात. अशा रीतीनें प्लेगजंतू मनुष्याच्या शरीरांत प्रवेश करून मनुष्यांत प्लेग होतो. ज्या वेळी पिसू आपली शुडिका रक्तशोषणासाठी रोंवते त्या वेळी ती दंशस्थानी ओकते किंवा हगते; आणि त्या ओकारीत अगर मलांत असलेले प्लेगजंतू शुडिका रोंवलेल्या जखमेंतून अंगांत प्रवेश करून प्लेग होतो, असे मानतात. दरएक पिसूच्या पोटांत सुमारे ५००० प्लेगजंतू राहू शकतात, असे शास्त्रज्ञांनी अनुमान काढले आहे ! पिसूच्या पोटांत जरी हजारों जंतू असतात तरी त्यांपासून तिला काहीही होत नाही. ही शक्ति ईश्वराने पिसूच्या अंगी दिली आहे. अशाच प्रकारची शक्ति ईश्वराने चिलटाचेही अंगी दिलेली आहे. ह्मणजे चिलटाचे पोटांत हिवतापाचे जंतू राहून त्यांपासून चिलटाला काहीही होत नाही. पिसवा ह्या खतः जरी ३०-४० यार्डीपेक्षां फार लांब जात नाहीत तरी त्या उंदरांवरून किंवा सामानाबरोबर पुष्कळ दूर जाऊं १. चिलटांच्या दुसऱ्या एका जातीपासून श्लीपद-(पाय मोठे होणे. Elephantiasis) नांवाचा रोग होतो. या रोगाच्या जंतूला 'फाय्लेरिआ' असे म्हणतात. हा रोग केवळ पायालाच होतो असे नसून तो शरीराच्या दुसऱ्या भागीही होत असतो. उदाहरणार्थ; हात, स्तन, अंड, योनी मार्गाचा बाह्य भाग, वगैरे.