या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शकतात. ज्या वेळी पिसवांना उंदीर, मनुष्य किंवा दुसरा कोणताही प्राणी निर्वाहासाठी मिळत नाही त्या वेळी त्या केरकचरा, धान्य अथवा मळीण वस्तू, चिंध्या, वगैरे जें सांपडेल त्यांत अन्नाशिवाय सुमारे पंधरा दिवसपर्यंत वांचू शकतात. परंतु तिला जर एखादा केस सांपडला तर ती त्याच्यावर बरेच दिवस काढूं शकते. तसेच शेण मिळाल्यास त्याच्याही पेक्षा जास्त दिवस जगते. जमिनीवर असतांना त्या आपली अंडी घालतात परंतु त्या अंडरूप पिसवांमध्ये प्लेगजंतू नसतात. ज्या वेळी त्या प्लेग झालेल्या उंदराचे रक्त शोषण करितात त्या वेळी प्लेगजंतुयुक्त होतात. प्लेगनें मेलेल्या उंदरापासून प्रत्यक्ष रीतीने हा रोग कांहीं दुसऱ्या निरोगी उंदरास लागत नाही. तर मृत उंदरांवरील पिसवा हा रोग दुसऱ्या उंदरास देतात, असें शास्त्रशोधकांनी केलेल्या अनेक प्रयोगांनी सिद्ध झाले आहे. _पिसू ही माणसाला चावल्यावर तिचा दंश जर एखाद्या रसवाहिनीत ( लिंफॅटिक्स ) झाला व त्या दंशस्थानांतून प्लेगजंतू शिरले तर त्यांना अडवून त्यांचा नाश करण्याची शक्ति रसग्रंथी( लिंफॅटिक ग्लँड )मध्ये ठेवलेली असते. ज्याप्रमाणे एका पहान्यांतन सुटलेला चोर दुसऱ्या पहान्यांत, दुसऱ्यांतून सुटल्यास तिसऱ्यांत पकडला जातो, त्याचप्रमाणे रसग्रंथी ह्या आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचे पहारेकरीच आहेत. रसग्रंथी ह्या ज्या वेळी प्लेगजंतंना अडवून धरतात त्या वेळी त्या सुजतात. ज्या वेळी पायाच्या रसवाहिनीवाटे जंतू जातात त्या वेळी जांघाडाचे ठिकाणी गांठ येते; हातावाटे गेल्यास काखेत व तोंडावाटे गेल्यास मानेच्या जागी