या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ गांठ येते. ज्या वेळी रसग्रंथींतील शक्ति प्लेगजंतूंपेक्षा जास्त असते त्या वेळी त्या ( रसग्रंथि) प्लेगजंतूंना मारून पचवून टाकतात. पण जर प्लेगजंतूंची शक्ति रसग्रंथींहून जास्त झाली तर प्लेगजंतू रसग्रंथींना न जुमानतां भराभर वाढून मग रक्तांत प्रवेश करूं लागतात. ज्या वेळी प्लेगजंतू रसग्रंथींतून रक्तांत शिरतात किंवा आरंभींच पिसूचा दंश एखाद्या रक्तवाहिनींत होऊन त्यावाटे गेलेले असतात त्या वेळी रक्तांत असणारे तांबडे व पांढरे रक्तकण ( Red and White blood-corpuscules) प्लेगजंतूंवर तुटून पडतात व त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न करतात. ह्या वेळी रक्ताची स्थिति जर सूक्ष्मदर्शक यंत्राने पाहिली तर वरील तांबड्या व पांढऱ्या कणांची व प्लेगजंतूंची एकच गर्दी होऊन गेलेली दिसते; व ज्याचा जोर ते जय पावतात. अर्थात् मनुष्याचे जीवित्व किंवा मृत्यु हे मुख्यत्वेकरून ह्याच गोष्टींवर अवलंबून असते. ही जी आपल्या अंगांत किंवा रक्तांत शक्ति असते त्या शक्तीला नैसर्गिक रोगप्रतिबंधकशक्ति असें ह्मणतात. ही शक्ति ज्याच्यामध्ये चांगली असते त्याला प्लेगचेचसे काय तर दुसऱ्या कोणत्याही रोगांचे फारसें भय नसते. हल्लीच्या शोधाप्रमाणे जंतू हे स्वतः मारक नसून त्यांपासून उत्पन्न होणारी मलमूत्रादि विर्षे ( टॉक्झिन्स )हीं फार मारक असतात, असें ह्मणतात. प्लेगजंतू एकदम रक्तांतच शिरल्याने जो ज्वर येतो तो फार भयंकर असतो. यांत गांठ येत नसते. प्लेगच्या काही प्रकारांत कॉलन्यासारखे झाडे होतात; काहीत काळपुळीसारखे अंगावर फोड येतात.