या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५३ प्लेगप्रतिबंधक उपाय.. १. उंदीर नाहीसे करणे हा उपाय जितका सोपा वाटतो तितका नाही. परंतु आपण जर मनावर घेतले तर तें होण्यासारखे आहे. प्रत्येकाने आपल्या रहात्या जागेत जरुरीपुरतें सामान ठेवलेले असावे व तेंही नीटनेटकें उंदरांस राहता येणार नाही अशा तजविजीने ठेवावें. कदाचित् त्यांत उंदीर शिरल्यास तो पकडता यावा अशी व्यवस्था असावी. सामानसुमान नेहमी कोनाकोपऱ्यांत न ठेवता उजेडांत ठेवावे. तसेच त्याच्या खालून रोज साफसूफ करितां येईल अशी जागा ठेवावी ह्मणजे सामान एकदम जमिनीवर रचूं नये. खोलीत व स्वयंपाकघरांत सामान व्यवस्थेने ठेवले नसल्यामुळे व जळाऊ लाकडांखाली उंदीर नेहमी राहतात, हे लक्षांत असावें. घरांतील जमिनी होतां होई तो घट्ट केलेल्या असाव्यात. घराचे आसपास केरकचरा, मलमूत्र, उष्टें किंवा दुसरे कोणतेही पदार्थ टाकून त्यांचे ढीग होऊ देऊ नयेत. घरांतील कोणतीही खाण्याची वस्तू उघडी ठेऊ नये. आपण नेहमी निरुपयोगी झालेल्या वस्तू लांब जाण्यास श्रम पडतील म्हणून ह्मणा किंवा आपल्याला समजत नसल्यामुळे ह्मणा, शेरीत, स्नानगृहांत, शौचकुपाचे शेजारी, कोनांत किंवा फार झाले तर दरवाज्याचे बाहेर जवळच टाकून देतो. ही चाल फार वाईट आहे. कारण असें केल्याने चुडीने जसा घरांत वाघ आणावा त्याप्रमाणे भक्ष्यशोधार्थ निघालेले उंदीर आपल्याकडे येतात. मेलेला उंदीर सांपडतांच तो केरोसीन तेल टाकून अथवा गवत घालून जाळून टाकावा व ती जागा पेस्टेरीन्नें अगर केरोसीन तेलाच्या इमल्शन्ने सारवावी.