या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ पेस्टेरीन्च्या अभावी किंवा केरोसीन तेलाचा खर्च करण्याइतकी ऐपत नसल्यास त्या जागी गवत पातळ पसरून त्यास आग लावावी. केरोसीनचे इमल्शन करण्याची रीतिः–हें तयार करण्यासाठी "सन् लाईट" छापाचा किंवा त्यासारखा दुसरा साबण तीन तोळे घेऊन त्याचे बारीक बारीक तुकडे करावे. हे तुकडे पंधरा तोळे पाण्यांत मिळवून ते पाणी साबण वितळेपर्यंत विस्तवावर उकळत ठेवावे. नंतर ते मिश्रण खाली उतरून त्यांत उन्हांत ठेवून ऊन केलेलें केरोसीन तेल ८२ तोळे मिळवावें. केरोसीन मिळवितांना हळुहळु साबणाचे मिश्रण ढवळीत असावें, ह्मणजे बासुंदीसारखी पांढरी राबडी होते; तिलाच केरोसीन तेलाचें इमल्शन् , असे म्हणतात. २. लस टोचून घेणे-(Inoculation.) या संबंधानें निरनिराळ्या लोकांची निरनिराळी मते आहेत. कित्येक म्हणतात, लस टोचून घेतल्यावर मागाहून कांहीं रोग जडतात व कित्येक कांहीं होत नाही ह्मणतात. स्वतःच्या एक दोन वेळ टोचून घेतलेल्या अनुभवावरून मी एवढे सागू शकतों की, लस टोचून घेतल्यानंतर मागाहून अल्पकालिक संधिवाताची लक्षणे होतात. अशा प्रकारचा विशेष त्रास न होतां देहसंरक्षण होत असेल तर मग लस टोचून घेण्यास हरकत नाही. ज्यांना स्थानत्याग करितां येणे शक्य नाही अशा लोकांनी लस टोचून घेणे हा उत्तम मार्ग आहे. लस टोचून घेणे ती गांवांत प्लेगची साथ सुरू झाली असे कळतांच घेणे बरें. आंगांत टोचण्यांत येणाऱ्या लसीचे प्रमाण ( Dose) पहिल्या खेपेस