या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अगदी कमी ह्मणजे सहन होईल इतके असते. ही लस अंगांत घातल्यावर ज्या वेळी रक्तांत जाते त्या वेळी रक्तांत असलेली नैसर्गिक रोगप्रतिबंधकशक्ति त्याचा पाडाव करिते; कारण ही शक्ति टोंचलेल्या विषाहून जास्त जोराची असते. पहिल्या खेपेचे प्रमाण सहन झाले ह्मणजे दुसन्या खेपेस त्याच्याहून जरा मोठे देण्यात येते. असें करण्याचे कारण यदाकदाचित् प्लेगचे विष रक्तांत गेल्यास त्याशी टिकाव धरितां यावा ह्मणून ही आंगांत असलेली रोगप्रतिबंधकशक्ति विशेष वाढवून ठेवण्यात येते. लस नेहमी हातांत टोचण्यांत येते. टोंचतांना काही दुखत नाही पण नंतर जसजसा वेळ जातो तसतशा हातांत खालून वर कळा मारू लागतात. टोंचलेली जागा साधारण सुजते. त्या रात्री प्रकृतिमानाप्रमाणे १०० पासून १०१ - डिग्री ताप येतो. सर्व रात्र हात गळू झाल्याप्रमाणे ठणकतो; झोंप लागत नाही. दुसऱ्या दिवशी ह्या वेदना थोड्या कमी होतात व तापही साधारण असतो. ह्या वेळी कित्येक जुलाब घेतात व त्यामुळे चांगले पडते. तिसऱ्या दिवशी ही सर्व लक्षणे कमी होतात व साधारण बरे वाटते. परंतु हातांतील वेदना अगदी नाहीशा होण्यास १०-१५ दिवस लागतात. ३. स्थानत्याग-सर्व उपायांमध्ये स्थानत्यागासारखा दुसरा उत्तम उपाय नाही. हा उपाय ज्याला साध्य आहे त्याला लस टोचून घ्यायला अगर उंदीर मारण्यास सांपळे शोधायाला नको. दूषित जागेतून प्लेगच्या भयाने स्थानत्याग करून जाणारे लोक १. आर्यवैद्यकांतही प्लेगप्रमाणेच जो मरक नांवाचा ( पटकी-महामारी ) रोग सांगितलेला आहे त्यांत देखील स्थानत्याग करावा, असें ह्मटले आहे.