या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५७ शुद्धिकर औषधे व त्यांचा उपयोग. रोगजंतू किंवा त्यांपासून उत्पन्न झालेली विर्षे यांची बाधा न होण्यासाठी ज्या औषधिद्रव्यांचा उपयोग करितात त्यांस शुद्धिकर औषध असे म्हणतात. अशा औषधांचे तीन वर्ग करितां येतील. १-हवेतील दोष दूर करणाऱ्या औषधांत सर्वांत उत्तम व सर्व ठिकाणी मिळणार असे औषध म्हटले म्हणजे सल्फ्यूरिका अॅसिडवायु, हे होय. सल्फ्यु रिक अॅसिडवायु (SulphurledAcid Gas):-हा वायु, गंधक जाळल्याने तयार होतो. दूषित जागा शुद्ध करण्यास यासारखें गुणकारी औषध दुसरे नाही. साधारणपणे १००० घनफूट जागेस १॥ रत्तल गंधक जाळला असतां पुरे होतो. २-शरीराच्या रोगी भागावर किंवा त्यापासून निघणाऱ्या रोगजन्यस्त्रावांवर कार्य करणारी औषधे.-दुखणेकऱ्यांच्या खोलीत व सभोंवार वापरण्यासारखीं उत्तम शुद्धिकर औषधे म्हटली म्हणजे क्रिओलीन व इझल, हीं होत. यांची उत्पत्ति दगडी कोळशापासून असून ती अमोल्य व भरंवशालायक आहेत. दुसरी गोष्ट अशी की, ती विषारी नसून दुर्गंधहीन आहेत. रोग्याचे मलमूत्र टाकण्याच्या भांड्यांत त्यांचा तीव्र द्रव (एक पाइंट पाण्यात एक मोठा चमचाभर ) घालावा. रोग्याच्या खोलीतील सामानसुमान पुसण्यास, मोया धुण्यास, वगैरे सौम्य द्रव ( एक प्रयास पाण्यास सुमारे ३ किंवा ४ चमचेभर ) वापरावा. १ जतूंसंबंधाची माहिती आर्यवैद्यकामध्ये एकाच ठिकाणी नसून ठिकठिकाणी (उदा०ः व्रण, कुष्ट, क्रिमी; वगैरे रोग प्रकरणी ) दिलेली आढळते. याशिवाय बरीचशी माहिती अथर्वसंहिते ( द्वितीयकांड, पञ्चम अनुवाक, पंचमसूक्त व पञ्चमकांड, पञ्चमअनुवाक्, द्वितीयसूक्त) मध्ये दिलेली आहे. त्यावरून आपल्या प्राचीन लोकांना जंतुशास्त्रासंबंधाने किती चांगली माहिती होती हे आर्यवैद्यकाचा उपहास करणाऱ्यांना विचार करण्यासारखे आहे.