या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लायसॉल:-पाण्यांत हा द्रव टाकून त्या पाण्याने रोग्याचें आंग स्पंजानें पुसतात. रसकापुर (Corrosive Sublimate):-हे फार विषारी द्रव्य आहे. याचा धातूचे भांड्यांवर व शस्त्रांवर परिणाम होऊन ती काळी पडतात. असें जरी आहे तरी तें बहुमोल शुद्धिकर औषध आहे. त्याचा द्रव १००० ते २००० भाग पाण्यांत १ भाग रसकापुर या प्रमाणाने करून वापरतात. FIRST कार्बालिक अॅसिडः-हेही वरच्याप्रमाणेच विषारी आहे. पण फार उपयोगी आहे. ६० भाग पाण्यांत एक, या प्रमाणाने मलमूत्र व मोया धुण्याकडे व ४० भाग पाण्यांत एक, या प्रमाणाने जखमा, व्रण, वगैरे धुण्यासाठी याच्या द्रवाचा उपयोग करितात. क्लोरिनेटेड चुना (Chlorinated lime ):-मोन्या, शौचकूप, वगैरे धुण्यासाठी (एक ग्यालन पाण्यांत सुमारे १-२ औंस घालून ) याचा उपयोग करितात. पोट्याश परमँगनेट (कांडीचा द्रव):-तीन पाइंट पाण्यात एक औंस पोट्याश परमँगनेट घालावा. चिकणमाती (Clay क्ले):-जमीन सारवण्यास शेणाच्या ऐवजी चिकणमातीच्या सारवणांत कार्बालिक अॅसिडाचा तीव्र द्रव टाकून उपयोग करणे बरें. ३-थंडी, उष्णता, हवा व सूर्यप्रकाश-थंडीः हे मोठे नैसर्गिक शुद्धिकर औषध आहे. पण तिचा उपयोग करितां येत नाही. उष्णता-रोग्याच्या आंगांतील व विछान्यावरील कपडे पाण्यात उकळावेत म्हणजे ते उत्तम प्रकारें शुद्ध होतात. गाद्या, रजयी, उशा, वगैरे न भिजवितां येणारे कपडे सुक्या उष्णतेने किंवा अत्युष्ण वाफेनें शुद्ध करावेत. हवा-घरांत शुद्ध हवा येण्याची योग्य तजवीज राखली तर त्यासारखें आरोग्यदायक दुसरे नाही. सूर्यप्रकाश-रोगजंतूंचा नाश करण्यास सूर्यप्रकाश हे अप्रतिम औषध आहे. याने पुष्कळ जंतूंचा नाश होतो. क्षयरोगाचे जंतू ( Tubercle