या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५९ Bacilli) जे एकाएकी नाश पावणे कठीण असते ते सुद्धा काही वेळ सूर्यप्रकाशांत राहिल्याने मृत होतात. _स्पर्शसंचारी रोगांत, रोगाचा संसर्ग बाकीच्या घरास व दुसऱ्या माणसांस होऊ नये यासाठी रोग्याचे खोलीच्या दरवाज्यावर क्रिओलीन, इझल किंवा कार्बालिक असिड यांपैकी एखाद्या औषधिद्रवांत एक पडदा ओला करून तो लावावा. आंत्रज्वर, पटकी, वगैरे रोगांत रोग्याचा मल हे मुख्यत्वेकरून संसर्गास कारण होते. यासाठी ज्या भांड्यांत मलमूत्र घ्यावयाचें त्या भांड्यांत पहिल्याने वरील तीन द्रवांपैकी एखादा द्रव घेऊन मग त्या भांड्यांत मलमूत्र ध्यावें; मलमूत्र घेतल्यावर लगेच त्यावर झांकण घालून ते भांडे खोलीच्या बाहेर न्यावे व लांब खाडा खणून त्यांत ओतून तो मल पुरून टाकावा. तशी सोय नसल्यास त्या मलमूत्राच्या भांड्यांत वरील द्रवांपैकी एखादा तीव्र द्रव टाकून तो मल शौचकूपांत टाकावा. मोरीत टाकण्यांत आल्यास तीत वरील औषधिद्रव टाकून ती पुष्कळशा कढत पाण्याने साफ धुवून टाकावी. तसेंच रोग्याचे मलमूत्र, पू, स्राव वगैरे पुसण्यासाठी वापरलेले कपडे जाळून टाकावेत. जाळतां न येण्यासारखे असल्यास वरील द्रवांत भिजवून चांगले शिजवावेत व मग पुनः धुवून उपयोगात आणल्यास हरकत नाही. रोग्याचे मलाने दूषित झालेले कपडे उकळल्याशिवाय कधीही तसेच धोब्याकडे देऊं. नयेत. कारण त्यांचा दुसऱ्या कपड्यांस संसर्ग होण्याचा बराच संभव असतो. रोगी दुखण्यांतून उठल्यावर त्याला स्वच्छ स्नान (कडुनिंबाचा पाला पाण्यात उकळून त्या पाण्याचे स्नान घालण्यास हरकत नाही.) घालून चांगले निर्मळ कपडे आंगांत घालण्यास द्यावेत. रोग्याला त्या खोलींतन चांगल्या जागी आणावें. रोग्याचे खोलींतील भिंतींस कागद वगैरे चिकटविलेले असल्यास ते काढून जाळून टाकावेत. तसेंच खोलींतील सामान क्रिओलीन. इझल, कार्बालिक अॅसिड यांपैकी एखाद्या द्रवांत फडका भिजवून त्याने पुसून काढावें. रोग्याचे सर्व कपडे, बिछाना, वगैरे सामान एकमेकांपासून दूर रचून ठेवावें व खोलीच्या मानानें गंधकाच्या कांड्या रत्तल अर्धा रत्तल घेऊन खोलीच्या मध्यभागी एखाद्या जुन्या तव्यावर ठेवून तो तवा जमिनीवर विटा रचून त्यावर अगर पाण्याच्या बालडीवर ठेवावा. नंतर त्या गंधकावर निखारे घालावे किंवा थोडा मद्यार्क (Spirit of Wine) टाकून पेटवावा व