या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खोलीचे दरवाजे, खिडक्या, फटी, वगैरे अगदी बंद करून टाकाव्यात. २४ तासांनंतर दरवाजे उघडून खिडक्या उघड्या टाकाव्या व खोलीत शुद्ध हवा येऊ द्यावी. खोलीस चांगली हवा लागली म्हणजे मग भिंती, छत, यांस चुना लावावा. जमीन चुन्याची असल्यास ती, तसेंच तक्तपोशी व इतर सामान काबालिक आसिडाच्या द्रवांत व मऊ साबणाच्या पाण्यात भिजविलेल्या बोळ्याने पुसावी. जमीन मातीची असल्यास जुनी माती काढून टाकून नवी माती घालून जमीन करावी अगर चिकणमातीच्या सारवणांत कार्बालिक आसिडाचा द्रव टाकून त्याने सारवावी.