या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रोग्यांच्या औषधपाण्याची पद्धतशीर सोय. १ रोग्यांच्या प्रकृतीचा लक्ष्यपूर्वक विचार करून रोगाला योग्य व गुणावह औषध पाठविण्यात येते. रोग्यांनी प्रत्यक्ष भेटून प्रकृति दाखवावी किंवा आमच्याकडून रुग्णपत्रिका मागवून त्याप्रमाणे कळवावें. तशी सवड नसल्यार आपणास होत असलेल्या रोगाची सर्व हकीकत-नांव, वय, चालू विकाराची लक्षणे, दुखणे किती दिवसांचें, डॉक्टर किंवा वैद्याने पाहिले असल्यास काय परीक्षा केली, उपाय कोणते केले, चालू रोगापूर्वी काय काय दुखणी होऊन गेली, चालू दुखणे कुटुंबांत आहे की काय, आहार कोणता मानवतो, संवयी, शाचाचे मान, झोप, शक्ति, रोगी स्त्री असल्यास वरील माहितीशिवाय एकंदर गर्भधारणा किती झाल्या, हयात मुलें किती, गर्भिणी किंवा बाळताण असल्यास किती महिने झाले, रोगी मूल असल्यास दूध आईचें की वरचें, दुधाशिवाय दुसरें कांहीं देण्यात येत असल्यास त्याची माहिती, चालू रोग भावंडांमध्ये होता की काय, वगैरे सर्व माहिती सुवाच्य अक्षराने लिहून कळवावी. २ ज्यांना केवळ वैद्यकीय मत ( रोग कोणता, औषध काय ध्यावें, पथ्यापथ्य, इतर सावधगिरीच्या सूचना, वगैरे खुलासेवार माहिती) पाहिज असेल किंवा विद्यार्थी, तरुण वगैरे रोग्यांकडून आलेल्या पत्रांस (मजकूर गुप्त ठेऊन) खुलासेवार जबाब पाहिजे असेल तर तो योग्य फी घेऊन देण्यात येतो. ३ ज्यांची मुंबईतच आमच्या देखरेखीखाली रहाण्याची इच्छा असेल किंवा आपल्या गांवीं येऊन तपासावें असें असेल त्यांची त्याप्रमाणे व्यवस्था करण्यांत येते. ४ वैद्यकीचा धंदा करणाऱ्या व इतर लोकांस त्यांच्या सोईसाठी सर्व प्रकारची इंग्रजी व आयुर्वेदिक औषधे व दुसरें वैद्यकीय सामान माफक दराने पाठविण्यांत येतें. ( यासाठी औषधांच्या मानाने अदमासे अर्धी रक्कम आगाऊ आली पाहिजे म्हणजे बाकी रकमेची व्ही. पी. करण्यात येईल.) ५ आमच्या फार दिवसांच्या अनुभवाने उत्तम ठरलेली औषधे मागणी. प्रमाणे पाठविण्यांत येतील. अशा औषधांची यादी किंमत, कमिशनचे दर, वगैरेसह छापलेली तयार मिळेल. एकंदर पत्रव्यवहार सुवाच्य असावा. आनंद फार्मसी. डॉ. गणपत पांडुरंग काळोखे, ठाकुरद्वार-मुंबई. ए. ए. एम्. एस्.