या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०७

आणिला असे म्हणतात. हा दांत उजव्या बाजूचा सुळा आहे असे ह्मणतात. त्याची लांबी २|| इंच आहे, यावरून हा दांत माणसाचा नसावा असे अनेकांचे मत आहे. 'हा दांत' एका रत्नजाडित पेटीत ठेविलेला आहे, व तो लोकांना क्वचितच दाखविण्यांत येतो.

 ही पेटी ज्या खोलीत ठेविली आहे ती फक्त सकाळी व सायंकाळी आराधनेच्या वेळी उघडली जात. दरवर्षी आगस्ट महिन्यांत मोठा उत्सव होऊन या पेटीची मिरवणूक निघते. या उत्सवास 'पेरहारा' असें ह्मणतात. उत्सव १० दिवस ( पंचमीपासून पौर्णिमेपर्यंत ) असतो. त्यावेळी कॅंडीचे सरदार सर्व उव्याजम्यानिशी हजर असतात. ही मिरवणूक रात्री निघते व त्यावेळी फारच उत्तम शोभा दिसते. बुध्दधर्मीयांचा या दांताबद्दल फारच मोठा आदर आहे त्यामुळे लक्षावधि लोक या दांताच्या दर्शनास येतात. या उत्सवास चीन, जपान, ब्रह्मदेश येथूनही कांही लोक येतात. वाद्ये व त्यामुळे होणारे दंगे -बुध्दलोक आणि मुसलमान यांचे- येथेही होतात त्यामुळे ज्या दिवशी ही मिरवणूक निघते त्या दिवशी पोलिसास कामही जास्त असते.

 ज्या देवळांत हा दांत ठेवलेली आहे त्यास "दलद मालिगव" असे म्हणतात. देवळाचा काही भाग तेराव्या शतकांतला आहे. दांत एकांतएक बसणाऱ्या सात पेट्यांत आहे. पेट्या सोनेरी असून सर्व रत्नखचित आहेत. दांत सोनेरी कमळाला सोन्याच्या सांखळीने गुंतविलेला आहे. उत्सवाचेवेळीं दांत देवळांत असतो, फक्त पेटीचीच मिरवणूक हत्तीवरून सोन्याच्या पालखीतून काढितात.

 देवळाला जोडून "ओरिएंटल लायब्ररी" आहे या ग्रंथसंग्रहालयांत पुष्कळ जुने ग्रंथ व ताडपत्रावरील पोथ्या आहेत.

 देवळाच्या शेजारीच "कॅडियन आर्ट सोसायटी" नांवाची निमसरकारी संस्था आहे. तेथे अगदी जुन्या पध्दतीने व जुन्या तऱ्हेचे काम केले