या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



११३

 बुद्ध लोक असें ह्मणतात कीं, जी स्त्री श्रीपाद पर्यंत पायी चालत जाईल ती मरणोत्तर पुरुषाचा जन्म पावेल. ज्या स्त्रियांना प्रसूतिसमयीं यातना होत असतील त्यांनी स्त्रीचा जन्म पुन्हा मिळू नये म्हणून वाटल्यास श्रीपादची यात्रा करून पहावी.

 श्रीपाद येथे जावयाचे झाल्यास रात्री मुक्कामास जावे म्हणजे शांतता येथे कशी नांदते याचा अनुभव येतो व सूर्योदयाचा अप्रतिम देखावाही दृष्टीस पडतो. सूर्योदयानंतर पश्चिमेस या शिखराची गर्दनिळी अशी छाया पडते. तो रंग प्रत्यक्ष पाहिल्यास नेत्राचे पारणे फिटल्यासारखेच वाटते. श्रीपाद च्या पर्वत शिखरास इंग्लिश लोक अॅडेम्स्पीक असे म्हणतात.

अनुराधपुरम्

 ही सीलोनची अत्यंत प्राचीन राजधानी होय. इ. स. पूर्वी ४०० साली पडुकभय नांवाच्या राजाने हे शहर स्थापिले असे म्हणतात. पुढे १४०० वर्षे हे राजधानीचे शहर होते. रोम शहराच्या भरभराटीच्या अगोदर किंवा रोमच्या उदयापूर्वी हे शहर भरभराटीत होते. या शहराचे प्राचीन वैभव नष्ट झाल्यावर कित्येक शतकें पर्यंत या ठिकाणी एकसारखें अरण्य वाढत गेलें व कित्येक वर्षे या ठिकाणीं शहर होते हेही लोक विसरून गेले. सुमारे ५० वर्षापूर्वी या ठिकाणी उत्खननाचे कार्य झाले व त्यावेळी निरनिराळी चित्रे, शिलालेख, डागोबा व इतर अनेक अवशेष या ठिकाणी सापडले. येथील शिलालेखांवरून सीलोनच्या प्राचीन इतिहासावर बराच प्रकाश पडला आहे.

 अनुराधपुरास कोलंबोहून जाण्यास रेल्वे आहे. तसाच उत्तम मोटारचा रस्ता आहे. रस्त्यांत दाट अरण्य आहे त्यामुळे रस्त्यावर कदाचित् रानटी हत्ती येण्याचा संभव असतो. गावांत उतरण्यास धर्मशाळा व हॉटेलें आहेत सर्वत्र चांगल्या सडका असून गांवाभोंवताली पाटाचे पाण्याखाली निरनिराळी पिकें होतात. बुद्ध लोकांच्या यात्रेचे हे ठिकाण अस-