हे पान प्रमाणित केलेले आहे.



सीलोनमध्ये गेल्याशिवाय परत फिरावयाचें नाहीं असे ठरलेलेच होते. मोठ्या माणसाबद्दल कांहींच फिकीर नव्हती, फक्त लहानमुले व स्त्रिया यांना हा कार्यक्रम थोडासा जिक्रारीचा होता. स्नाने झाल्यावर सर्व मंडळी पुन्हा एकत्र आली. डाक्टरांनी सर्वांस उभे राहण्यास सांगितले. नंतर एकजण प्रत्येकाच्या दंडाला देवीची लस लावून गेला. पुढे डाक्टराने येऊन कांहीनां दोन कांहींना तीन देवी टोचल्या. या वेळींहीं डाक्टर बरोबर रीतीने म्हणजे पुर्ण शास्त्रीय रीतीने काम करीत नव्हते.

 देवी काढण्याचा विधी या प्रमाणे आटोपला. ज्यांना नैसर्गक देवी येऊन गेल्या होत्या त्यांनाच मान्न देवी काढल्या नाहींत. स्त्रियांना टोचण्याकरिता स्त्री डाक्टरोण होता. अशा त-हेने हा विधी आटोपल्यावर आमचे कपडे आम्हांस मिळाले ते सर्व ओले झाले होते. वाळविण्यास पुरेशा सोय नव्हती, खाली समुद्राची बारीक रेता असल्यामुळे कपडा थोडा हातांतून सुटला की तो रेतीने भरें. थोड्याच वेळाने आम्ही आपले सामान सुमान गुंडाळले व मग मी पुन्हां डाक्टरकडे गेलो. डाक्टराला भेटून सांगितले को आम्ही ८-४ दिवसां करितां जाणार प्रत्येक दिवशी शक्यतर दुसन्या गावी जाणार तेव्हा आम्ही सहज चैनी करितां जाणार असल्यामुळे दररोज डाक्टरकडे जाणे आम्हांस त्रास दायक होईल व आमचा वेळही बराच फुकट जात जाईल. आमच्या या म्हणण्याचा विचार करून डाक्टरने आमच्या पासपोर्ट वर * परत येताना ताालेमनारवर पोर्टसर्जनकडे आपण परत जात आहो असा रिपोर्ट करावा असे लिहून दिले. यामुळे आमच्या भागचो दररोज डाक्टरकडे जाण्याची दगदग टळाली.

 देवी काढण्याबद्दचे इतके कडक नियमकां असें मी विचारले असतांनां डाक्टर म्हणाले की लाहोर येथे देवाने प्रळय केला, मुंबईतही पुष्कळ लोक मेले गरीब बिचारे सिंहली मरूं नयेत म्हणून हे कडक नियम पाळप्यांत येतात. युरोपियन्स व अँग्लो इंडियन्स ज्यावेळीं सीलोनमध्ये जातात.