हे पान प्रमाणित केलेले आहे.



१३

मनुष्य हातांत धरला असून तो खाऊन टाकणार आहे असे दाखविले आहे. पूर्वीच्या दागिन्यावर रत्ने अनेक आहेत. पूर्वीच्या राजाचे एक चुनाळ आहे त्यावर सर्व बाजूंनी लहान लहान रत्थे बसविलेली आहेत. अशा प्रकारच्या नानाविध वस्तु येथे आहेत. येथे असलेल्या वस्तूवरून सीलोनची संस्कृति समजण्यास सुलभ जाते.

 एके ठिकाणी सीलोनी पूर्वकालीन तोफ आहे. तिची लांबी सरासरी दोन फूट आहे व परिघ ८।१० इंचाचा आहे. ही तोफ पाहून माझ्या मनाला धक्का बसला व सीलोनला आपली रत्ने व आपली संपत्ति कां रक्षण करितां आली नाही याचा विचार पुन्हा एकवार मनांत आला.

 ज्याचे शस्त्र त्याचे साम्राज्य हा त्रिकाल बाधित सिद्धांत आहे. राष्ट्राची सुधारणा किंवा विज्ञानशास्त्रांतील प्रगति त्याच्या शस्त्रावरून अनुमित होते. राष्ट्राचे शस्त्र ज्या मानानें सुधारलेले असेल त्या मानाने त्या राष्ट्राची आर्थिक सुधारणा होते हा सिद्धांत आहे आणि ह्मणून या म्यूझियममध्ये असलेल्या लहान तोफा पाहिल्यावर सीलोनमधील सर्व संपत्ति परकीयांच्या हात सहजा सहजीं कां गेली ते चटकन समजते.

 कॅडीच्या राजाचे सिंहासन ब्रिटिश म्यूझियममध्ये आहे. ते रत्नजडित सिंहासन पुन्हां कोलंबो येथील म्यूझियममध्ये आणून ठेवावे अशी सीलोनी लोक आपल्या कायदे मंडळातर्फे मागणी करीत आहेत असे आह्मांस तेथील सीलोनी गृहस्थानी सांगितले. म्यूझियमची इमारत भव्य असून पुढे मोठे पटांगण आहे. पटांगणांत सुरूंची सुंदर झाडे असून त्यांना खुर्ची, हंडी, पेला अशा प्रकारचे आकार दिलेले आहेत व त्यामुळे ती फारच सुंदर दिसतात.

 म्यूझियम मधून निघून आह्मी बुद्ध मंदिराकडे गेलो. तेथे मोठे आवार असून एका व्यासपीठावर बुध्दभिक्षु बसून कांहीं वचनं म्हणत होता. ही वचने सिंहली भाषेत असल्यामुळे तो काय ह्मणत होता ते आम्हांस