हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६

 दुसँरै दिवशीं कैंडी व रत्नपुरम्च्या बाजूस जाण्याचे ठरविले, रोजी ४० रु. भाड्याने मोटार ठरावली व नंतर मग आम्ही मुक्कामास परत आलों, आह्मी उतरलो होता, तेथे शेजारीच नाटकगृह होते. नाटकास गर्दी होती. नाटक कंपनी मदुरेहून आलेली असून नाटक तामील होते. तथापि श्रीयुत वाघ यांच्या मनांत नाटक पहावयाचे आले म्हणून नाटकास गेलो. एक रुपया दराची तीन तिकीटें काढून श्रीयुत वाघ, मी व एक शिक्षक असे नाटकास गेलो नाठकगृह चांगले १००-१२५ फूट लांब होते. नाटकगृहास मजला नव्हताच. फक्त मागील बाजूस चढती बाकांची रांग होती. एकामागे एक अशा खुच्र्यांच्या पुष्कळच रांगा असल्यामुळे मागील बाजूच्या लोकांना जरा अडचणच होती. स्त्रिया अगदी थोड्या आलेल्या होत्या. नट पद्य ह्मणू लागल्यावर तबलजी किंवा पेटीवाला सूरधरून पद्य ह्मणू लागे. नाटक आह्मास कळालें नाहीं तेव्हां शेजारी बसलेल्या एका गृहस्थास मि, वाघ यांनी या नाटकांत काय आहे असा सवाल इंग्रजांत केला. त्या गृहस्थाला मि, वाघ हे काय म्हणतात ते कळेना. तेव्हा मी मि, वाघ यांनां बटलरी इंग्रजीत प्रश्न विचारण्यास सुचविले व त्या प्रमाणे मि. वाघ यांनी प्रश्न विचारतांच त्या गृहस्थाने उत्तर दिले.

 कालवे येथे 'रीगल थियेटर' नांवाचे नाट्य मंदीर फारच सुंदर आहे. असो. थोडावेळ नाटक पाहून आह्मी परत आलो व नंतर झोपी गेलो.

 दुसरे दिवशी सकाळी आह्मी चहा वगैरे घेऊन तयार झाला ते सुमारे ७ वाजता मोटार आली तीत बसून आम्ही कॅडीस निघालो. रस्ता उत्तम होता, जिकडे तिकडे निसर्गाची शोभा फारच सुंदर दिसत होती, वाटेंत एक चहा व रवर फैक्टरी लागली. तेथे जाऊन चहा व रबर यांजवर कोणते संस्कार करितात ते पाहिले व पुढे प्रवास चालू केला,