हे पान प्रमाणित केलेले आहे.
२४

णाला होत नसेल. मी या ह्मणण्याची प्रतीति पहाण्याकरितां पुढे जास्त काळजीने निरीक्षण करू लागलो.

 एके दिवशीं नाशिकच्या मेनरोडवरील पोलिसास एका गुजराथी गृहस्थाने हा रस्ता स्टेशनकडे जाते. कां असे विचारले तेव्हां शिपाईबाबास घुस्सा येऊन ते ह्मणाले “बेवकूब क्या पूछता है. चलो जाव". ही गोष्ट माझ्या डोळ्यादेखत घडली. एकदां माझ्या स्नेह्याने ७५ रु. याचा चैक दिला तो घेऊन मी नासिकचे ब्यकेंत गेलो. तेथील कारकुनाने "तुमच्या स्नेह्याची ७५ रु. देण्याइतकी शिल्लक नाही" हे सांगण्यास ४५ मिनेट लावली. असो असे नाना तऱ्हेचे प्रसंग पाहिल्यामुळे व अनुभविल्यामुळे महाराष्ट्रांतील ऑफिसांतून लहानापासून मोठ्या ऑफिसरापर्यंत सामान्यतः स्वभावाचे मार्दव कमी, क्षुद्र कल्पना काढून एखाद्याची अडचण करण्याची प्रवृत्रि फार असे माझे मत झालेले आहे. माझे हे मत चुकीचे आहे व मी स्वाभिमानशून्य आहे असे सर्व लोक ह्मणतील हे मला माहीत आहे पण मी जें वर विधान केलेले आहे त्याला मजजवळ भरपूर पुरावा आहे.

 असो पैसे परत मिळाल्यावर मी पुढील गाडीला रामेश्वरी प्रयाण केले. महराष्ट्रीय लोकांना सीलोनची सर्वांगीण माहीती मिळावी ह्मणून ती क्रमवार पुढे दिलेली आहे.

सीलोनमध्ये जाण्याबद्दलचे नियम

 सीलोनला जाणारे पॅसेंजर जर निरोगी असतील तर त्यांस कारंटाइनमध्ये न ठेवतां पुढील अटीवर जाऊ दिले जाते.

 ( अ )( १ ) पॅसेंजर जवळ चेअरमन बोर्ड ऑफ क्वारंटाइन कोलंबो यांचा पास ( परवाना ) असावा.

  ( २ ) मॅंडपम् कॅंप येथील क्वारंटाइन मेडिकल ऑफिसर यांस अशी मोकळीक देतां येते. त्यांनी परवानगी दिल्यास