हे पान प्रमाणित केलेले आहे.



२६

आहे की त्यावरून हे बेट हिंदुस्थानापासून कोट्यवाध वर्षांपूर्वी अलग झालेले असावे असे कांहीं शास्त्रज्ञांना वाटते. कांहीं शास्त्रज्ञ असेही ह्मणतात की, अत्यंत प्राचीन काळीं हिंदुस्थान व सीलोन यांजमध्ये समुद्र नव्हता.

 हे बेट रखें, मोती, हत्ती, मसाला, रबर, चहा, क्विनोन व कोकेन याकरितां फार प्रासद्ध आहे. बुद्धधर्माचे प्राबल्य सीलोनमध्ये विशेष असल्यामुळे बुद्धधर्माचा ज्यास काळजीपूर्वक अभ्यास करावयाचा असेल त्यास बुद्धधर्मीयांचे ग्रंथ व त्या ग्रंथांचे अध्ययन केलेले भिक्षु येथे आढळतात.

 प्रस्तुतकाली हिंदुस्थान व सीलोन यांजमध्ये एक लहानसा समुद्राचा भाग आल्यामुळे सलिोन हिंदुस्थानपासून वेगळे पडलेले आहे. साउथ ई० रेलवेचे शेवटचे स्टेशन धनुष्कोडी व सीलोन यांमध्ये फक्त २२ मैलांचे अन्तर आहे व धनुष्कोडीहून सीलोनला जाणाच्या बोटी दररोज सुटतात व दोन तासांत सीलोनला जाऊन पोहोंचतात.

 या बेटाची दक्षिणोत्तर लांबी २७० मैल आहे व पूर्वपश्चिम रुंदी १० मैल आहे. हे बेट सैसोर किंवा आयर्लडपेक्षां जरा लहान असून त्याचे क्षेत्रफळ २५४८१ चौरस मैल आहे.

 बेटाच्या मध्यभागी पर्वतश्रेणी आहेत व सर्वात उंच पर्वत पेडोतालागेला' या नांवाचा आहे. त्याचे अत्युच्चशिखर ८२९६ फूट उंच आहे. उत्तर भाग सपाट असून तो अनेक वालुकामय द्वीपकल्पांचा बनलेला आहे. पश्चिम आणि पूर्व किनाच्या लगतचा अरुंद पट्टा अतीशय सुपीक आहे.

 हे बेट विषुववृत्ताजवळील ६ ते १० अंशांच्यामध्ये असल्यास येथील हवा उष्ण आहे. तथापि कराची, उमरावती, व अकोला या ठिकाणापेक्षां उष्णतामान पुष्कळच कमी असते. चोहोबाजूंनी समुद्रावरील शीत वारे वाहात आल्यामुळे उष्णतामान कमी राहते. हिवाळ्यांत व उन्हाळ्यांत अत्युच्च उष्णतामान अनुक्रमे ८० व ८५ अंश असते. रोजच्या अत्युच्च व अतिनीघ उष्णता मानांत १० अंशापेक्षां बहुधा जास्त फरक पडत नाहीं.