हे पान प्रमाणित केलेले आहे.
२९

सोलीनमधील अक्षय्यसंपात्तचा झरा होय. सीलोनमधील शेतकरी खरोखर भाग्यवान! भू माता त्याचा चरितार्थ सुखाने चालावा ह्मणून अनेक प्रकारची फळे, फुले व धान्य त्यास सदैव पुरविते. एक एकर नारळाची बाग असली की घरी बसून निदान ३० ते २५ रु. दरमहा मिळतो. १६ ते ५५ वयापर्यंतच्या प्रत्येक पुरुषास दरसाल रु. १-५ आणे पोलटेक्स् द्यावा लागतो व हाच काय तो प्रत्यक्ष कर. तेथे इन्कमटॅक्स नाहीं व जमीनसाराही नाहीं. राज्यकारभाराला लागणारा पैसा कस्टमड्यूटि, रेल्वे वगैरे मार्गाने जमविला जातो. मि. शार्प यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी सीलोनला भेट दिली त्यावेळी त्यांनी वरील उद्गार कादिले आहेत. अलीकडे जमीनीवरील कर व इन्कमटॅक्स असे दोन्ही कर सरकारने बसविले आहेत.

 येथे पर्जन्य पुरेसा पडतो व हवा उष्ण आहे त्यामुळे तांदळाचे पीक मुख्यतः होते. तथापि तेथील लोकांना पुरेसा तांदूळ पिकत नाहीं यामुळे मलबार व ब्रह्मदेश येथून पुष्कळसा तांदूळ आयात होतो. अलीकडे ब्रह्मदेशाचा तांदूळ आणणे जास्त स्वस्त पडू लागल्यामुळे मलबारच्या तांदुळास मागणी फार कमी येऊ लागली आहे.

 तांदुळाशिवाय निरनिराळ्या प्रकारची द्विदल धान्ये, गहू व कापूसही येथे पिकतो. कांहीं भागांत तंबाखूचे पीकही थोडेसे येते.

 पपई, अननस, फणस, केळी वगैरे अनेक प्रकारची फळे व भाजा यांचे पीक ही चांगले येते. नानाविध प्रकारची फुलझाडे सर्वत्र दिसतात व बहुतेक लोकांच्या घरांच्या परड्यांत कॉफी, नारळ व फुलझाडे लावलेली दिसतात.

प्रवासाची साधने

 या लहानशा बेटांतून परदेशी विविध पदार्थ पाठविले जातात तसेच युरोपियन मळेवालेही पुष्कळ ठिकाणी आहेत. शिकारीची उत्तम सोय, अप्रतिम नैसर्गिक सौन्दर्य, आल्हादकारक हवा, इंग्लंडसारखी रम्य अशी