हे पान प्रमाणित केलेले आहे.



४२
इतिहास


 सीलोनचा पूर्वेतिहास दंतकथांनी विशेषतः भरलेला आहे. अलीकडे प्राक्कालिन विषयांचा अभ्यास करणारांनीं शिलालेख, नाणी, जुने अवशेष, सीलोनी बखरी इत्यादिकांच्या साह्याने पुष्कळशी ऐतिहासिक माहीती गोळा करून इतिहास लिहिला आहे. त्याला अनुसरून सामान्य वाचकाकरितां पुढील माहीती दिली आहे.

 महावंश नांवाच्या जुन्या सिंहली बखरीत असे वर्णन दिलेले आहे की, बंगालमधील एका बंगाली कन्यकेला सिंहापासून गर्भ राहिला व पुढे जो मुलगा झाला त्याचे नांव सिंहल असे ठेविले. या सिंहलने प्रस्तुतच्या बेटांत जाऊन वसाहत केली व सिंहलच्या नांवावरून या बेटास सिंहलद्वीप असे नांव पडले.

 ही गोष्ट रोमच्या इतिहासांतील राम्युलस आणि रमिस यांच्या गोष्टी सारखी आहे. तथापि एवढे खरें कीं खिस्तशकापूर्वी कांहीं शतकें येथे वसाहत झाली होती. गंगा नदीच्या खोल्यांतलि विजय नांवाचा राजपुत्र ख्रिस्तपूर्व ५४३ सालीं सीलोनमध्ये गेला व तेथे त्याने राज्य स्थापिले. तद्देशीय लोकांशी स्नेहाचे संबंध रहावेत म्हणून विजयाने सीलोनमधील एका सरदाराचे मुलीशी लग्न केले. विजयाबरोबर सीलोनमध्ये हिंदुधर्म गेला परन्तु विजयाच्या वेळी, बंगालच्या बाजूस ब्राम्हणीधर्म व ब्राम्हण वाङ्मय यांचा विशेष प्रसार झालेला नसल्यामुळे सीलोनमध्यें ब्राह्मण किंवा त्यांचा धर्म प्रसार पावू शकला नाही.

 बिजयानंतर दक्षिण हिंदुस्थानांतील तामिळांनीं सीलोनवर अनेक स्वान्या केल्या व सिंहली राजांना आपली राजधानी कर्मीतकमी पांच वेळा बदलावी लागली.

 बुद्धधर्माचा पुरस्कर्ता अशोक याने आपल्या लोकांस बुद्धधर्माचा