हे पान प्रमाणित केलेले आहे.



४८

करण्याचा प्रयत्न करीत असतो. ब्राह्मण, खिस्ती, किंवा मुसलंमान यांची समज असा असतो की, प्रार्थना केली म्हणजे पापाचा नाश होता. एका पापाचा क्षय प्रार्थनेने झाला ह्मणजे दुसरे पाप केले तर त्याचा नाशही प्रार्थनेने करितां येईल असेंही कांहीं लोक समजतात.

 बुध्दधर्माच्या तत्वावर जे टीकात्मक ग्रंथ अन्यधर्मीयांनी केलेले आहेत ते मूल ग्रंथांचे सांगोपांग अध्ययन केल्यानंतर लिहिलेले दिसत नाहीं, कांहीं ठिकाणची टीका पूर्ण तर्कशुध्द आहे असे दिसत नाहीं.

 पुष्कळ लोकांचा असा समज आहे की, बुध्दानें अहिंसेचे तत्व प्रतिपादिले व त्यामुळे यागीय हिंसा बंद झाली. पण हे मत खरे नाहीं. संहिताकरणकालच ब्राह्मण धर्मात स्थित्यंतरें घडून येऊन यागीय हिंसा बंद झालेली होती. बुध्दाच्या पूर्वीच महावीर-जैनधर्माचा स्थापनकर्ता-यान अहिंसेचा प्रसार केला होता. बुध्दाच्या दशशिक्षांमध्ये पाणातिपातावेरमा इति शिख्खापदम् प्राण्यांचा घात करू नये अशी आज्ञा आहे. परन्तु बुध्द स्वतः मांसाशन करीत असे असें महापरिनिन्बानसत्त- बुध्दाच्या निर्वाण कालाचे वर्णन असलेले सूक्त--- यावरून दिसते. बुध्दभिक्षुनीं मांशासन केलेली किंवा त्यांस इतरांनीं मांस दिलेली अनेक वर्णने बुध्दवाङ्मयांत वाचावयास सांपडतात.

 बुध्दानें जातिभेद मोडला हैं ह्मणणेही फारसे खरे नाही. एक तर बुध्दाचे काली जातिभेद आतांच्या सारखा बध्दमूल झालेला नव्हता. याशिवाय दुसरे असे की, बुध्दाच्या कुलांत इतर कुलांशी शरीरसंबंध होऊं नय म्हणून बहीण व भाऊ यांचेही विवाह करण्यास परवानगी दिल्याचे अंबईसुत्तावरून दिसते.

 बुध्दधर्मानें अहिंसेचा प्रसार केला व त्यामुळे हिंदुस्थानांत शस्त्रवैद्यकाचा उत्कर्ष झाला नाहीं असा कांहीं लोकांचा समज झालेला आहे. पण तो खरा नाहीं.