या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४

काळ्याचहांबरोवर ही मिसळतात ( १/८ हिरवा + ७/८ काळा ) व त्यास हायसन, यंगहायसन किंवा गनपावडर असे म्हणतात. हिरवा चहा पंजाबमध्यें बराच होतो.

 २ फ्लावरी किंवा ब्रोकन ऑरेंज पिको :- कळी व तिच्या जवळील कोवळी दोन पाने जमाकरून तयार केलेल्या चहास हें नांव आहे.

 ३ पहिल्या पानाच्या चहास ऑरेंज पिको म्हणतात.

 ४ दुसऱ्या पानाच्या चहास पिका म्हणतात.

 ५ जुनाट फांदीच्या पानापासून गेलेल्या चहास पीकोसूचांग म्हणतात, ऑरेंजापिको, पिकासूचांग हे चिनी शब्द आहेत.

 सन १८७३ सालीं सीलन मधून फक्तं २३ पौंड चहा बाहेर पाठविण्यांत आला होता व त्याची किंमत ५८ रु. आली. सांप्रत सुमारे ४७०००० एकरांत चहा पिकाविला जातो व एकंदर १२३० चहाचे मळे ( टी इस्टेटस् ) आहेत व त्यांचे दरसालचे उत्पन्न २४,००,००,००० पौंड आहे. यावरून सीलोनमधील चहाची पैदास किती मोठी आहे ते दिसून येईल.

 हिंदी चहाला इंग्लंड, फ्रान्स, कानडा व अमेरिका या देशांची मागणी फार मोठी असते. सीलोनच्या चहाला आस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांतून फार मागणी असते. इंग्लंड व अमेरिका येथेही सीलोन मधून पुष्कळ चहा जातो.

रबर

 सीलोनमध्ये सांप्रत रबराच्या लागवडीखालीं सुमारे ४|| लक्ष एकर जमीन गुंतलेली आहे. रबराची झाडे ठिकठिकाणी डोंगराच्या उतरणीवर, दऱ्यांमध्ये, पर्वत शिखरावर चहाच्या मळ्याच्या बाजूला वाढलेली दिसतात. जगांत दरसाल ६४० सहस्त्र टन रबर तयार होतो. त्यापैकी ब्रिटिश मलायांत ३०२; डच ईस्टइंडीजमध्ये २३३; सीलोनमध्ये ५७; सहस्त्र टन