या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बदलून घ्यायची. त्यानुसार कालच लंडनहून आपली ड्यूटी संपवून निलू मुंबईला परतली होती. आणि आरामात महिला व पुरुषांचे अंतिम यू. एस. ओपनचे सामने ती पाहू शकणार होती!
 व्हीनस ही तिची आवडती टेनिसपटू, तशीच तिट धाकटी बहीण सेरेनाही तिला आवडायची. त्यांची दणकट अॅथलेटिकची शरीरयष्टी, ताकदवान खांदे व पाय आणि झंझावती फटके यांची ती चाहती होती.
 "हॅम, त्या दोघींना टॉपला पोचलेलं व अंतिम सामन्यात खेळताना पाहताना बरं वाटलं! यू नो? आय आयडेंटिफाय वुईथ देअर स्पेक्टॅक्युलर राईज अॅण्ड इक्वली टिमण्डस सक्सेस! त्या कृष्णवर्णीय भगिनींशी माझं एक दलित व वर्णभेदाची बळी म्हणून नातं आहे. एक गहिरा दर्दका रिश्ता है, जो मुझे उनकी तरफ खींचता है। आज दोन बहिणींतच सामना असल्यामुळे कुणीही जिंकलं तरी अफसोस नाही वाटणार."
 तो किंचित हसत तिचे खांदे दाबतो आणि तिला जवळ ओढतो. तीही आवेगान त्याच्या कुशीत शिरते, पण अजूनही तिचा मूड मॅचचा असतो. ती म्हणते, “एकच राहून राहून वाटतं. व्हीनस वा सेरेना थोड्या आधी जन्माला यायला हव्या होत्या आणि टेनिसच्या सर्वोत्तम महान खेळाडू गौरवर्णीय मार्टिना नवरातिलोव्हा व स्टेफी ग्राफला त्यांनी हरवायला हवं होतं आणि त्यांच्या विरुद्ध अॅण्डस्लॅम जिंकायला हवं होतं!"
 तो घशातून हुंकारत तिचे बॉब केलेले केस ओढत राहतो. ती त्याच आवेगात पुढे बोलत राहते. “अगदी तसंच, जसं एकेकाळी.. फार जुनी गोष्ट नाही.. तू सॅमला मागं टाकलं होतंस.. टेस्टमध्ये दोन सलग डबल सेंच्युरी मारून व पहिल्याच वनडे इंटरनॅशनलमध्ये सेंच्युरीसह भारताला विजय मिळवून देऊन, तो हॅम मी कुठे हरवून बसले रे?"
 हॅमचं मन ठसठसू लागलं होतं. नेहमी टीपकागदाप्रमाणे त्याच्या चेह-यावरच भाव वाचणाच्या निलूचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. ती आपल्याच मूडमध्ये होती. खूप दिवसांपासून पराभूत व हताश हॅमला पाहून मनात डाचणाया भावना ती प्रकट करात पुढे म्हणाली, "मला तो माझा आवडता हॅम का सापडत नाही? गिव्ह मी अन्सर हम. यु- यू - ओ अॅन एक्सप्लेनेशन टू मी! डोंट यू थिंक सो? तुझा हा जिगरी दोस्त सन तुला व्हीव रिचर्डप्रमाणे ब्लॅक डायमंड म्हणायचा., त्याचं तेज कुठं गेलं? तो का फिकुटला?"

 निलुला बरीच चढली होती. टेनिस किंवा क्रिकेटची मॅच पाहताना तिला मनसोक्त प्यायला लागायचं. आजही तिच्या आवडत्या व्हीनस व सेरेना या विल्यम भगिनींमध्ये टेनिसचा अंतिम सामना होता. तो पाहताना विचार न करता ती पीत होत अशा वेळी तिची नेहमीची शांत व धीरोदात्त वृत्ती तिला आवरणं कठीण जायचं. तिचा खदखद आणि वेदनाही त्यांच्या संदर्भातली असायची. त्यामुळे तो अधिकच खोलवर

११२