या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९. रन बेबी रन माफ कर बेबी. तुझी इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही. तुझा हा गुरू, हा कोच अखेर रणांगणातून पळ काढणारा ठरला. तुझ्याप्रमाणेच. तूही नाही का जीवनातून पळ काढलास? | समोर चिता भडकलेली. तिच्या वा-यानं फरफरणाच्या ज्वालांची दाहकता दुरूनही जाणवणारी, पण त्या गर्दीत किंचित अधोमुख असलेल्या गुरूला त्याचं भान नव्हतं. तो चितेत भस्म होणा-या बेबी नामक कलेवराच्या प्राणतत्त्वाशी मूक संवाद करीत होता.. खरं तर तो आत्मसंवाद होता! गेल्या आठ वर्षातील गुरू- शिष्याच्या क्रीडा प्रवासाचा वेध घेणारा. कॅलिडोस्कोपिक. मनात एकाच वेळी अनेक आठवणीच उठलेलं मोहोळ. फ्लॅशबॅकप्रमाणे मागंपुढं कालानुक्रम न पाळणारं. रन, बेबी रन!” | राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत १०० मीटर धावण्याची अंतिम फेरी. तो दिवस गुरुपौर्णिमेचा होता. गुरूच्या पाया पडत बेबी म्हणाली होती, ‘सर, आज मी गोल्ड मेडल मिळवून तुमच्या चरणी वाहणार. आय प्रॉमिस यू.' “मला खात्री आहे. आजचा दिवस तुझा आहे. उद्याच्या पेपरची हेडलाईन तुझ्या नावाची असणार आहे. तिच्या डोक्यावरून हात फिरवत व पाठ थोपटत तो म्हणाला होता. “रन, बेबी रन.. यू आर गोइंग टू विन.' असं तिला चिअर्स अप करीत गुरू प्रोत्साहन देत होता आणि डोळ्यांचं पातं लवतं न लवतं, तोवर राष्ट्रीय उच्चाक नोंदवत बेबीनं ती शंभर मीटर धावण्याची शर्यत जिंकली होती. | आज ती बेबी विद्युत वेगानं प्राणतत्त्व सोडून कुठं पळून गेली होती? ही धाव वेगळीच होती. ‘स्टार्ट' चा फायर करून आदेश नव्हता की, ‘रन, बेबी रन'चं चिअर्स अप नव्हतं. तरीही कशी सुसाट धावत नजरेआड झाली कायमची. मघाशी चितवर पष्पहारानं मढवलेलं तिचं शरीर आता भाजल्यामुळे जळून खाक कोळसा झालं होत. केवल चेहरा वाचला होता. तो किती शांत व प्रसन्न वाटत होता. त्यावर अखेरचे शब्द १२४ । लक्षदीप